Download App

दीड वर्ष उलटलं तरीही धास्ती कायम; अदानींच्या शेअर्सबाबत गुंतवणूकदारांत धाकधूक..

हिंडेनबर्ग रिसर्चने आज सकाळीच सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट केली आहे. यामध्ये इशारा देण्यात आला आहे.

Hindenburg Research : 24 जानेवारी 2023 हा दिवस अदानी उद्योग समुहाला विसरताच येणार नाही. याच दिवशी गौतम अदानींना (Gautam Adani) जोरदार धक्का बसला होता. याच दिवशी हिंडेनबर्ग रिसर्च संस्थेने अदानी ग्रुपशी संबंधित एक रिपोर्ट प्रसिद्ध केला होता. हा अहवाल आल्यानंतर अदानी उद्योगाचे शेअर्स तर कोसळलेच शिवाय सगळाच शेअर बाजार हादरला. ही परिस्थिती अजूनही काही प्रमाणात दिसून येत आहे. कारण अजूनही काही कंपन्यांचे शेअर्स पूर्वपदावर आलेले नाहीत.

भारतातील दुसरे सर्वात मोठे उद्योजक गौतम अदानी (Gautam Adani) ग्रुपमध्ये खळबळ उडवून देणाऱ्या हिंडेनबर्ग संस्थेच्या (Hindenburg Research) अहवालाने पुन्हा एकदा मोठा इशारा दिला आहे. हिंडेनबर्ग रिसर्चने आज सकाळीच सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट केली आहे. यामध्ये जो इशारा देण्यात आला आहे त्याद्वारे भारतात मोठी खळबळ उडाली आहे. भारतासाठी लवकरच काहीतरी मोठं घडणार आहे, असा इशारा देण्यात आला आहे. आता हा इशारा कुणाला देण्यात आला आहे? यामागे कारण काय आहे की आणखी एखादा धक्कादायक अहवाल हिंडेनबर्ग देणार अशा चर्चा आता सुरू झाल्या आहेत.

Hindenburg Research : हिंडेनबर्गचा मोठा धमाका, अदाणीनंतर ट्विटरच्या माजी संस्थापकावर केले धक्कादायक आरोप

हा अहवाल येऊन वर्ष उलटून गेलं तरी देखील अदानी उद्योग समुहाच्या कंपन्यांचे शेअर्स पूर्वपदावर आलेले नाहीत. आता याच हिंडेनबर्गने भारताबाबत पुन्हा इशारा दिला आहे. या इशाऱ्यानंतर हिंडेनबर्गच्या निशाण्यावर कोण अशी चर्चा आता सुरू झाली आहे. याबाबत खुलासा झाला नसला तरी हा इशारा शेअर बाजाराशी संबंधित असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे. इतकेच नाही तर जे सर्वसामान्य गुंतवणूकदार आहेत त्यांच्या मनात अदानी ग्रुपबाबत (Adani Group) चलबिचल सुरू झाली आहे. तर काही जण हिंडेनबर्गच्या विश्वसनीयतेवर प्रश्न उपस्थित करत आहेत.

गेल्यावर्षी जानेवारी २०२३ मध्ये हिंडनबर्गने अदानी समुहाच्या हेराफेरीवरून गौप्यस्फोट केले होते. त्यामुळे शेअर बाजारात भूकंप झाला होता. अदानी जगातील २ नंबरच्या अब्जाधीश पदावरून थेट ३६ व्या क्रमांकावर गेले होते. यानंतर काही महिन्यांनी पुन्हा अदानी ग्रुपच्या शेअरमध्ये गुंतवणूकदारांचा विश्वास वाढू लागला होता. अदानी ग्रुपचे बाजारमुल्य ८६ अब्ज डॉलरपर्यंत कमी झाले होते. अमेरिकन इन्व्हेस्टमेंट रिसर्चने अदानी समूहावर कॉर्पोरेट जगतातील सर्वात मोठी फसवणूकीचा आरोप केला होता. रिपोर्टमध्ये अदानी समूहावर शेअर्समध्ये फेरफार आणि अकाउंटिंग फ्रॉडचा आरोप करण्यात आला होता.

follow us