Download App

गृह मंत्रालयाचा सोनिया गांधींना दणका; निकटवर्तीयाची सीबीआय चौकशी होणार

नवी दिल्ली : गृहमंत्रालयानं (Home Ministry)हर्ष मंदारच्या एनजीओविरोधात (NGO)सीबीआय (CBI)चौकशीची शिफारस केली आहे. फॉरेन एक्स्चेंज रेग्युलेशन अॅक्ट म्हणजेच FCRA चे उल्लंघन केल्याबद्दल ही कारवाई करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. निवृत्त आयएएस अधिकारी हर्ष मंदार (Harsh Mandar)हे अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi)यांच्या जवळचे असल्याचं म्हटलं जात आहे.

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग (Manmohan Singh)यांच्या कार्यकाळात मंदार हे राष्ट्रीय सल्लागार समितीचे सदस्य होते. एनजीओच्या विरोधात चौकशीसाठी केंद्रीय गृह मंत्रालयाची शिफारस सरकारने दिल्लीच्या शीर्ष थिंक टँक सेंटर फॉर पॉलिसी रिसर्च (CPR) चा FCRA परवाना निलंबित केल्याच्या काही दिवसानंतर आली आहे.

फडणवीस म्हणाले…आम्ही कधीच आडमुठी भूमिका घेतली नाही

FCRA कायदा हा परदेशातून मिळालेल्या देणग्यांचं नियमन करतो. 2021 मध्ये, अंमलबजावणी संचालनालयाने (ED) हर्षच्या घरावर छापा टाकला होता. त्यानंतर या कारवाईला कार्यकर्ते, वकील आणि शैक्षणिक क्षेत्राशी निगडित लोकांनी जोरदार विरोध केला होता.

केंद्रीय गृह मंत्रालयाने एफसीआरएचे उल्लंघन केल्याबद्दल लेखक आणि मानवाधिकार कार्यकर्ते हर्ष मंदार यांच्या एनजीओविरुद्ध सीबीआय चौकशीची शिफारस केली आहे. मंदार हे ‘अमन बिरादरी’ नावाची एनजीओ चालवतात. परदेशी निधी प्राप्त करणाऱ्या सर्व एनजीओंना FCRA अंतर्गत गृह मंत्रालयाकडे नोंदणी करणे गरजेचे असते.

Tags

follow us