आसाममध्ये भारतीय वायू दलाच्या AN-32 ला अपघात; विमानाचे दोन तुकडे, 5 जवान शहीद

भारतीय वायू दलाच्या AN-32 मालवाहू विमानाला भीषण अपघात झाला असून, या दुर्घटनेत वायू दलाचे पाच जवान शहीद झाल्याची माहिती समोर आली आहे.

Untitled Design (37)

Untitled Design (37)

Horrific accident involving an Air Force aircraft in Assam : आसामच्या जोरहाट एअरबेसवर भारतीय वायू दलाच्या AN-32 मालवाहू विमानाला भीषण अपघात झाला असून, या दुर्घटनेत वायू दलाचे पाच जवान शहीद झाल्याची माहिती समोर आली आहे. नियमित उड्डाणावर असलेल्या या विमानाचे लँडिंगदरम्यान नियंत्रण सुटल्याने मोठा स्फोट झाला आणि विमानाला भीषण आग लागली. धडकेची तीव्रता इतकी होती की विमानाचे मध्यभागातून दोन तुकडे झाले.

या भीषण अपघातानंतर एअरबेसवरील अग्निशामक दल आणि आपत्कालीन पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. भरतोय वायू दलाने या दुर्घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, विमान मुख्य धावपट्टीवर सुरक्षितपणे उतरू शकले नाही. त्याऐवजी एअरबेसच्या गवताळ भागात त्याची क्रश लँडिंग झाली. जमिनीवर आदळताच विमानाचा मोठा स्फोट झाला. विमानातील क्रू मेम्बर्स आणि इतर जवानांच्या स्थितीबाबत सुरूवातीला अनिश्चितता होती, मात्र नंतर पाच जवान शाहिद झाल्याची बातमी समोर आली.

जोरहाटजवळील हवाई तळ हा पूर्वोत्तर भारतातील हवाई कारवाया आणि धोरणात्मक हालचालींसाठी भरतोय वायू दलाचा महत्वाचा केंद्रबिदू मनाला जातो. त्यामुळे या दुर्घटनेकडे संरक्षण क्षेत्रात विशेष गांभीर्याने पाहिले जात आहे. AN-32 हे विमान 1986 पासून भारतीय वायू दलाच्या सेवेत आहे. सोव्हिएत युनियनच्या अँटोनोव्ह डिझाइन ब्युरोने विकसित केलेले हे दोन इंजिनांचे शक्तिशाली मालवाहू विमान दुर्गम आणि आव्हानात्मक भागांमध्ये कार्य करण्यासाठी ओळखले जाते. हिमालयीन प्रदेश, पूर्वोत्तर राज्ये तसेच अत्यंत प्रतिकूल हवामानातही हे विमान यशस्वीपणे उड्डाण करू शकते.

वेरुळ शिक्षक मृत्यू प्रकरणात चार जणांना अटक; फौजदार एकनाथ नागरगोजे अजुनही मोकाटच

या विमानाची मालवाहतूक क्षमता सुमारे 6.7 टन असून, एकावेळी 40 हून अधिक सैनिकांना वाहून नेण्याची क्षमता त्यात आहे. तसेच लहान आणि कच्च्या धावपट्ट्यांवरही टेक-ऑफ व लँडिंग करण्याची त्याची विशेष क्षमता आहे. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन, पूरस्थिती, रसद पुरवठा आणि युद्धकाळातील मोहिमांमध्ये AN-32 विमानाला भारतीय वायू दलाची ‘लाईफलाईन’ मानले जाते.

तथापि, या विमानांच्या अपघातांचा इतिहासही चिंताजनक राहिला आहे. 1986 पासून सेवेत दाखल झाल्यानंतर भारतात AN-32 प्रकारच्या विमानांचे सुमारे 22 अपघात झाल्याची नोंद आहे. 2025 मध्येही अशाच प्रकारची दुर्घटना घडली होती. सध्या भारतीय वायू दलाकडे 100 हून अधिक AN-32 विमानांचा ताफा असून, त्यांचे आधुनिकीकरण सुरू असतानाच टप्प्याटप्प्याने नवीन विमानांची भर घालण्याची प्रक्रियाही सुरू आहे.

या दुर्घटनेमुळे AN-32 विमानांच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले असून, चौकशी अहवालानंतर अपघातामागील नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

Exit mobile version