Download App

2000 ची नोट चलनात कशी आली होती? अन् यापूर्वी कधी कधी झाली होती नोटबंदी ?

Rbi To Withdraw Rs 2000 Currency Note From Circulation But It Will Continue To Be Legal Tender : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India) एक मोठा निर्णय घेतला आहे. RBI ने 2000 च्या नोटा बाजारातून काढून घेण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, 2000 ची नोट (2000 notes) चलनात कशी आल्या? कधी कधी नोटबंदी झाली? याच विषयी जाणून घेऊ.

2000 च्या नोटा कधी चलनात आल्या?
9 नोव्हेंबर 2016 रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात नोटाबंदीची घोषणा करून देशातील नागरिकांना आश्चर्याचा धक्का दिला होता. नोटबंदीची घोषणा करतांना मोदींना 1000 आणि 500 ​​रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून बाद केल्या होत्या. त्यानंतर काही दिवसांतच आरबीआयने पुन्हा 500 रुपयांची नवी नोट चलनात आणली. तर 1000 रुपयांच्या नोटेऐवजी 2000 रुपयांची नोट चलनात आली.

मोदी सरकारची दुसरी नोदबंदी : १ ऑक्टोबर २०२३ पासून २०००ची नोट ‘कागज का टूकडा’

https://www.youtube.com/watch?v=WYyIDGgDii0

नोटबंदीच्या निर्णयावर टीका
केंद्र सरकारच्या या निर्णयावर बरीच टीका झाली होती. उच्च मूल्याच्या नोटा चलनातून मागे घेतल्या गेल्या आणि 2000 रुपयांची नवीन नोट बाजारात आली तेव्हा नोटाबंदीचा नेमका उद्देश काय होता? असा प्रश्न तेव्हाही उपस्थित करण्यात आला होता. विरोधकांनी मोदी सरकारच्या नोटबंदीच्या निर्णयावर चांगलीच टीका केली होती. ही 2000 ची नोट लवकरच चलनात येईल, असा अंदाजही अर्थतज्ञांनी तेव्हा व्यक्त केला होता. दरम्यान, आता रिझर्व्ह बँकेने यावर अखेर निर्णय घेतला असून नागरिकांना 2000 रुपयांच्या नोटा बँकेत जमा करण्यासाठी 30 सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे.

23 मे 2023 पासून तुम्ही बँकांमध्ये जाऊन 2000 च्या नोटा बदलू शकता. परंतु तुम्ही एकावेळी फक्त 20,000 रुपयांच्या नोटा म्हणजेच 10 रुपयांच्या नोटा बदलू शकता.

चलनात दोन हजारांच्या नोटांचं किती प्रमाण होतं?
आरबीआयच्या वार्षिक अहवालानुसार, 31 मार्च 2017 पर्यंत चलनात असलेल्या नोटांच्या एकूण मूल्याच्या 50.2 टक्के 2,000 रुपयांच्या नोटा होत्या. तर 31 मार्च 2022 रोजी चलनात असलेल्या नोटांच्या एकूण मूल्याच्या 13.8 टक्के 2,000 रुपयांच्या नोटा होत्या. विशेष बाब अशी की, 2019-20, 2020-21 आणि आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये 2,000 रुपयांची एकही नोट छापली गेली नाही.

कधी कधी झाली नोटबंदी?
आरबीआयने 1938 मध्ये 10 हजार रुपयांची नोट छापली होती. 1946 मध्ये आरबीआयने 500, 1000 आणि 10000 रुपयांच्या नोटांवर बंदी घातली होती. त्यानंतर सन 1954 मध्ये 1000, 5000 आणि 10000 रुपयांच्या नोटा चलनात आल्या. जानेवारी 1978 त्या नोटा बंद झाल्या. यानंतर 500 आणि 1000 रुपयांच्या नव्या नोटा चलनात आल्या. परंतु 8 नोव्हेंबर 2016 रोजी मोदींना नोटबंदीची घोषणा करून पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा चलनातून मागे घेतल्य होत्या. त्यानंतर 2017 मध्ये 500आणि 2 हजार रुपयांच्या नोटा चलनात आल्या. यापैकी आता 2000 रुपयांची नोट बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

 

Tags

follow us