Delhi Earthquake: दिल्ली NCR भूकंपाच्या तीव्र धक्क्यांनी हादरले! नागरिकांची पळापळ

Delhi earthquake: दिल्लीला भूकंपाचे जोरदार धक्के बसले आहेत. जास्त वेळ धक्के जाणविल्याने नागरिक हे घर, कार्यालयांमधून मोकळ्या जागेत पळाले आहेत. दिल्लीबरोबर राष्ट्रीय राजधानी क्षेत्र (एनसीआर) मध्येही जोरदार धक्के जाणवले आहेत. या भूकंपाचे झटके उत्तराखंड राज्यातही बसले आहे. दोन वेळा धक्के बसले आहेत. पहिला धक्का आज दुपारी 2 वाजून 25 मिनिटाने जाणवला आहे. त्यानंतर 2 वाजून […]

Earthquake

Earthquake

Delhi earthquake: दिल्लीला भूकंपाचे जोरदार धक्के बसले आहेत. जास्त वेळ धक्के जाणविल्याने नागरिक हे घर, कार्यालयांमधून मोकळ्या जागेत पळाले आहेत. दिल्लीबरोबर राष्ट्रीय राजधानी क्षेत्र (एनसीआर) मध्येही जोरदार धक्के जाणवले आहेत. या भूकंपाचे झटके उत्तराखंड राज्यातही बसले आहे. दोन वेळा धक्के बसले आहेत. पहिला धक्का आज दुपारी 2 वाजून 25 मिनिटाने जाणवला आहे. त्यानंतर 2 वाजून 51 मिनिटाला दुसरा धक्का जाणवला आहे.

पहिला झटका 4.6 रिश्टर स्केलचा होता. तर दुसरा धक्का जास्त तीव्रतेचा होता. हा धक्का 6.2 रिश्टर स्केलचा होता, अशी माहिती नॅशनल सिस्मोलॉजी सेंटरकडून जाहीर करण्यात आली आहे. भूकंपाचे केंद्र नेपाळ असल्याचे सांगितले आहे. त्याची खोली दहा किलोमीटर इतकी आहे. दिल्ली, एनसीआरसह हरियाणा, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, पंजाब, राजस्थानमधील काही भागात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.

या राज्यांमध्येही जाणवले धक्के 

भूकंपाचा केंद्रबिंदू असलेल्या नेपाळशिवाय हे धक्के दिल्ली एनसीआर, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हरियाणा पंजाब आणि राजस्थानमध्येही जाणवले. या भूकंपामुळे आतापर्यंत कोणतीही जीवित किंवा मालमत्तेची हानी झाल्याचे वृत्त नाही. मात्र, नेपाळमध्ये काही घरे कोसळल्याचे वृत्त आहे. ज्या भूकंपाचे धक्के जाणवले त्यावेळी दुपारी अनेकजण कामात व्यस्त होते. मात्र, अचानक भूकंपाचे धक्के जाणवू लागल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले यामुळे अनेक कार्यालयांमधील तसेच घरात असणाऱ्या नागरिकांनी जीवाच्या भीतीने मोकळ्या जागेत पळ काढला. भूकंपाच्या धक्क्यांमुळे केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया हेही त्यांच्या कार्यालयातून बाहेर पडले.

दिल्ली संवेदनशील झोनमध्ये

देशाची राजधानी दिल्ली भूकंपाच्या दृष्टीने संवेदनशील मानली जाते. भारतातील शास्त्रज्ञांनी भूकंप क्षेत्राची विभागणी झोन-2, झोन-3, झोन-4 आणि झोन-5 अशी केली आहे. झोन-5 मधील क्षेत्र सर्वात संवेदनशील मानले जातात, तर झोन-2 हे सर्वात कमी संवेदनशील मानले जाते. देशाची राजधानी दिल्ली झोन-4 मध्ये येते. त्यामुळे येथे रिश्टर स्केल 7 पेक्षा जास्त तीव्रतेचे भूकंप देखील होऊ शकतात असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Exit mobile version