Download App

किरकोळ बाजारातील दरवाढ रोखण्यासाठी कांद्याची ‘बफर स्टॉक’मधून विक्री; केंद्र सरकारचं मोठं पाऊल

निर्यात शुल्क हटवल्यानंतर किरकोळ बाजारात कांद्याची झालेली दरवाढ पाहता केंद्र सरकारने घाऊक बाजारात 'बफर स्टॉक' मधून विक्री वाढविली.

  • Written By: Last Updated:

Sale of Onion From Buffer Stock :  केंद्र सरकारने निर्यात शुल्क हटवल्यानंतर किरकोळ बाजारात कांद्याची झालेली दरवाढ पाहता केंद्र सरकारने घाऊक बाजारात ‘बफर स्टॉक‘ मधून विक्री वाढविली आहे. (Onion) कांद्याच्या किमतीवर नियंत्रण ठेवण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आल्याचे ग्राहक कल्याण खात्याच्या सचिव निधी खरे यांनी आज माध्यमांशी बोलताना सांगितलं.

तर न्यायालयीन चौकशी नक्कीच होईल; बदलापूर एन्काऊंटर प्रकरणावर काय म्हणाले उज्वल निकम

दिल्लीमध्ये मागील वर्षी सप्टेंबरमध्ये कांद्याचे दर प्रतिकिलो ३८ रुपये होते. ते वर्षभरात ५५ रुपये किलोवर पोहोचले आहेत. दिल्लीप्रमाणेच मुंबई आणि चेन्नईमध्ये देखील कांद्याचा दर अनुक्रमे ५८ आणि ६० रुपये प्रतिकिलो एवढा झाला आहे. केंद्र सरकारने दिल्ली आणि इतर प्रमुख शहरांत घाऊक बाजारात ‘बफर स्टॉक’मधील कांद्याची विक्री सुरू केली आहे.

राजधानी दिल्लीसह अन्य राज्यांच्या राजधानीच्या शहरांत सरकारने पाच सप्टेंबरपासून राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ (एनसीसीएफ) आणि ‘नाफेड’च्या मोबाइल व्हॅन आणि दुकानांमधून ३५ रुपये प्रति किलो दराने कांद्याची विक्री सुरू केली आहे. त्यापार्श्वभूमीवर देशभरात अनुदानित दराने कांद्याची किरकोळ विक्री वाढविण्याची सरकारची योजना असल्याचे सचिव निधी खरे यांनी स्पष्ट केलं.

केंद्र सरकारकडे ४.७ लाख टनांचा बफर साठा असून खरिपातील कांदा लागवडीचे क्षेत्र देखील वाढलं आहे. यामुळे कांद्याचे दर आटोक्यात राहतील. केंद्र सरकार कांद्याची ३५ रुपये प्रति किलो अनुदानित दराने किरकोळ विक्री वाढविण्याचा विचार करत असून यामध्ये राष्ट्रीय सरासरीपेक्षा किमती जास्त असलेल्या शहरांवर अधिक लक्ष देण्यात येईल, असेही खरे यांनी सांगितलं.

अक्षय शिंदेवर गोळी झाडणारा पोलीस अधिकारी कोण? जीव धोक्यात घातला अन् चालवली गोळी

सरकारने दहा दिवसांपूर्वी कांदा निर्यातीवर आकारले जाणारे ५५० डॉलर प्रति टन किमान निर्यात शुल्क रद्द केलं होतं. खाद्यतेलाच्या आयातीवरील आयात शुल्क वाढविण्याचा निर्णय घेतला होता. यामध्ये कच्च्या पाम तेलावरील आयात शुल्क २० टक्क्यांपर्यंत आणि शुद्ध सूर्यफूल तेलावरील आयात शुल्क ३२.५ टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आलं आहे.

follow us