Seema Haider : नेपाळमार्गे पाकिस्तानातून भारतात आलेली सीमा हैदर (Seema Haider) 2023 मध्ये चर्चेत होती. सीमा हैदर-सचिनच्या लव्हस्टोरीची भारतातच नव्हे तर पाकिस्तानातही चर्चा झाली होती. सीमा हैदरने नवीन वर्षात एक आनंदाची बातमी दिली आहे. सीमा हैदर आता सचिनच्या (Sachin Meena) मुलाची आई होणार आहे.
सीमा हैदर पुन्हा चर्चेत आली
आता 2024 च्या पहिल्याच दिवशी सीमा हैदर पुन्हा एकदा प्रेग्नेंसीवरुन चर्चेत आली आहे. सध्या ती पती सचिन मीनासोबत ग्रेटर नोएडामध्ये राहत आहे. सीमा हैदर लवकरच पती सचिन मीनाच्या मुलाची आई होणार असल्याची माहिती समोर येत आहे. खुद्द सीमा हैदर यांनी ही माहिती दिली आहे.
एका खासगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सीमा हैदरने सांगितले की, ती यावर्षी आई होणार आहे. होळीपर्यंत ती आई होणार का? या प्रश्नावर सीमा हैदर म्हणाली की, इतक्या लवकर नाही. पण हो, मला आणि सचिनला नक्कीच बाळ होणार आहे.
पंतप्रधान राजीव गांधी अन् काँग्रेस कार्यकर्ता; रामजन्मभूमीचे कुलूप वीस मिनिटात कसे उघडले ?
सचिनच्या वडिलांनीही सीमा हैदरच्या गरोदर असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मुलाखतीदरम्यान सचिनच्या वडिलांनी सांगितले की, सुनेचा हात पाहिला आहे. तिला नक्कीच मुलगा होणार आहे. ज्याचा हात बघून मी सांगतो ते कधीच खोट होत नाही. सीमा हैदरने सांगितले की, तिला आणि सचिनला एक बाळ व्हावं अशी माझी इच्छा आहे.
Happy Election Year : जगभरात धुमशान! या वर्षात तब्बल 78 देशांमध्ये निवडणुकांचे वारे
PUBG खेळताना सचिन पाकिस्तानी तरुणी सीमा हैदरच्या प्रेमात पडला होता. गेल्या वर्षी सीमा हैदर आपल्या मुलांसह नेपाळला पोहोचली होती. येथे सचिन आणि सीमा हैदर यांचा एका मंदिरात विवाह झाला होता. यानंतर दोघेही सचिनच्या गावी पोहोचले. सीमा हैदरवर आयएसआय एजंट असल्याचा आरोपही करण्यात आला होता, मात्र तपासानंतर सीमा हैदरला क्लीन चिट देण्यात आली होती. सीमा हैदरला पहिला पती गुलाम हैदरपासून चार मुले आहेत. सीमा सर्व मुलांना घेऊन पाकिस्तानातून भारतात आली होती.