Download App

9 Years Of Modi Government : दहा दिवसात PM मोदी देशाला देणार मोठं गिफ्ट?

central vista project : दिल्लीतील मोदी सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने नवीन संसद भवनाचे (new parliament) उद्घाटन एका भव्य कार्यक्रमात केले जाऊ शकते. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात संसदेचे उद्घाटन करू शकतात, परंतु या वृत्ताला अद्याप अधिकृतपणे पुष्टी झालेली नाही. 26 मे 2014 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली होती.

या नवीन संसद भवनासाठी मार्शल आणि कर्मचाऱ्यांसाठी नवीन ड्रेस असेल. या नवीन गणवेशाची रचना NIFT ने केली आहे. यासोबतच येथे कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. चार मजली संसद भवनात 1224 खासदारांसाठी बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

Honey Trap Case : DRDO चे संचालक प्रदीप कुरुलकरची रवानगी थेट येरवड्यात…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 10 डिसेंबर 2020 रोजी नवी दिल्ली येथे एका कार्यक्रमात नवीन संसद भवनाची पायाभरणी केली होती. केंद्र सरकारने 2019 मध्ये सेंट्रल व्हिस्टा पुनर्विकास प्रकल्प सुरू केला होता. यामध्ये नवी दिल्लीतील इतर प्रकल्पांसह संसदेच्या नवीन इमारतीच्या बांधकामाचा समावेश आहे. नवीन संसद भवनातील लोकसभेच्या तळाचा आराखडा राष्ट्रीय पक्षी मोर या थीमवर ठेवण्यात आला आहे.

नवीन इमारत जुन्या संसद भवनापेक्षा 17,000 चौरस मीटर मोठी आहे. ही इमारत पूर्णपणे भूकंप प्रतिरोधक आहे. याची रचना ‘HCP डिझाइन, प्लॅनिंग अँड मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड’ ने केली आहे. बिमल पटेल हे नवीन संसदेचे इंजिनिअर आहेत.

उत्तरप्रदेशमधील भीषण अपघातात 8 जणांचा मृत्यू

संसदेच्या नवीन इमारतीत एकावेळी 1200 हून अधिक खासदार बसण्याची सोय आहे. यामध्ये लोकसभेत 888 तर राज्यसभेत 384 खासदार बसू शकतात. नवीन इमारतीत एक सुंदर संविधान कक्षही बांधण्यात आला आहे. हे राष्ट्रपती भवनापासून हाकेच्या अंतरावर आहे. सेंट्रल व्हिस्टा पुनर्विकास प्रकल्पांतर्गत बांधण्यात आलेल्या चार मजली नवीन संसद भवनात लाउंज, लायब्ररी, कमिटी हॉल, कॅन्टीन आणि पार्किंगची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.

follow us