Independence Day 2024 : भारत 15 ऑगस्ट 2024 रोजी आपला 78 वा स्वातंत्र्यदिन (Independence Day 2024) साजरा करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) या दिवशी लाल किल्ल्यात ध्वजारोहण कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहे. त्यामुळे देशाची राजधानी दिल्लीमध्ये 15 ऑगस्टच्या तयारीला अंतिम स्वरूप देण्यात येत आहे. दिल्ली पोलिसांकडून 15 ऑगस्टसाठी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.
या कार्यक्रमासाठी दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) तब्बल 3 हजार वाहतूक पोलिस अधिकारी, 10 हजार पोलिस कर्मचारी आणि 700 AI आधारित चेहरा ओळखणारे कॅमेरे तैनात केले आहे. तसेच दिल्ली एअर पोर्ट, रेल्वे स्थानक, बस स्टॅन्ड, शहरातील मॉल्स आणि बाजारपेठेमध्ये अतिरिक्त पोलिस दल आणि निमलष्करी दल तैनात करण्यात आले आहे. याच बरोबर 15 ऑगस्ट रोजी वाहतूक नियंत्रित करण्यासाठी तीन हजारांहून अधिक वाहतूक पोलिस तैनात करण्यात आले तसेच शहरातील प्रमुख जंक्शन आणि लाला किल्ला परिसरात देखील वाहतूक पोलिस तैनात असल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे.
पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थित होणाऱ्या या कार्यक्रमावर लक्ष ठेवण्यासाठी यावेळी दिल्ली पोलीस 700 AI-आधारित फेशियल रिकग्निशन सीसीटीव्ही कॅमेऱ्याची मदत घेत आहे आणि जेव्हा पंतप्रधान मोदी देशाला संबोधित करतील तेव्हा लाला किल्ल्यावर 10 हजार हून अधिक सुरक्षा कर्मचारी तैनात असणार आहे.
तर दुसरीकडे या कार्यक्रमाला हजेरी लावणाऱ्यांची ओळख पटवण्यासाठी स्मार्टफोन आधारित ॲप्लिकेशन देखील दिल्ली पोलीस वापरणार आहे. पंतप्रधान मोदींसह इतर व्हीव्हीआयपी पाहुण्यांच्या सुरक्षेसाठी स्नायपर, SWAT कमांडो, शार्पशूटर तैनात असणार आहे. दिल्ली पोलिसांकडून सध्या हॉटेल, गेस्ट हाऊस, पार्किंग लॉट आणि रेस्टॉरंटची तपासणी सुरु झाली आहे.
Akshay Kumar : अक्षय कुमारसाठी ‘खेल खेल में’ ठरणार गेम चेंजर ?
रूममध्ये राहणाऱ्या लोकांची आणि तिथे काम करणाऱ्या नोकरांची पडताळणी करण्यात येत आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी देशात कोणती नवीन योजना सुरु करणार का? याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून आहे. तसेच विरोधकांवर काय बोलणार याकडे देखील सर्वांचे लक्ष लागून आहे.