INDIA Alliance : इंडिया आघाडीच्या बैठकीत शरद पवारांनी भाजपवर टीका केली. सत्ता हाती आल्यानंतर ज्या लोकांचे एकेकाळी जमीनीवर पाय होते. त्याच लोकांच्या हातात सत्ता आल्यानंतर त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीवर परिणाम झाला आहे. तर भाजपचे वरिष्ठ नेते विरोधकांना घमेंडी म्हणतात. त्यावरूनच स्पष्ट होत की, घमेंडी कोण आहे. जे लोक एकत्र आले आहेत चर्चा करत आहेत. त्यांना घमेंडी म्हणण्याची वेळ येते म्हणजे तेच घमेंडी आहेत.
बोबड्या आवाजात ‘आमच्या पप्पांनी गपती आणलायं’ म्हणणारा चिमुरडा नेमका कोण?
काय म्हणाले शरद पवार?
अनेक दिवसांपासून देशासमोर अनेक गंभीर समस्या आहेत. त्यावर या बैठकीत चर्चा झाली. त्यावर एक ठराव करण्यात आला आहे. या सर्व बैठकीच्या आयोजनाची जबाबदारी पार पाडणाऱ्या ठाकरेंची शिवसेना कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचे मी आभिनंदन करतो. सर्व नेत्यांचे मी आभार मानतो. या आघाडीची सुरूवात बिहारमध्ये बेंगलोरमध्ये झाली. आज मुंबईत तिसरी बैठक झाल्याने आपली पुढची लाईन क्लिअर झाली आहे. आज देशातील विविध राज्यात वेगवेगळी स्थिती आहे. समस्या आहेत. शेती, तरूण, मजूर यांच्या समस्या आहेत.
‘खोटं बोला पण, रेटून बोला’; मराठी म्हणीचा आधार घेत खर्गेंचा मोदींवर घणाघात
आज लोकांनी ज्या विश्वासाने भाजपला देशाचा कारभार करण्याची जबाबदारी दिली. मात्र आज त्याच लोकांमध्ये नाराजीची भावना ठिकठिकाणी दिसत आहे. त्यांना विविध समस्या आहेत. पण सत्ता हाती आल्यानंतर ज्या लोकांचे एकेकाळी जमीनीवर पाय होते. त्याच लोकांच्या हातात सत्ता आल्यानंतर त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीवर परिणाम झाला आहे.
आम्हाला घमेंडी म्हणण्याची वेळ येते म्हणजे तेच घमेंडी आहेत…
आपण पाहतो की, राजकारणात राजकीय पक्ष एकत्र येत काम करण्याचं ठरवतात तेव्हा त्यांच्या कामाबाबत आणि त्यांच्या नितीवर काही शंका घेतली जाऊ शकते. मात्र केवळ आम्ही बैठक घेण्याचं ठरवलं तर भाजपने त्यावर टीका करायला सुरूवात केली. ते म्हणाले की, भेटायची काय गरज आहे? पण एकत्र येत लोकांच्या समस्यांवर चर्चा करण्यात गैर काय? यावरून एकच दिसत की, 10 वर्ष देशाची सत्ता हाती आल्यानंतर जमिनीवर पाय ठेऊन काम करण्याची गरज आहे. पण हे लोक त्यापासू दूर गेले आहेत. भाजपचे वरिष्ठ नेते विरोधकांना घमेंडी म्हणतात. त्यावरूनच स्पष्ट होत की, घमेंडी कोण आहे. जे लोक एकत्र आले आहेत चर्चा करत आहेत. त्यांना घमेंडी म्हणण्याची वेळ येते म्हणजे तेच घमेंडी आहेत. त्यामुळे मी वचन देतो की, आम्ही चूकीच्या मार्गाला जाणार नाही. आम्ही थांबणार नाही. तसेच जे लोक योग्य मार्गावर नाहीत त्यांना योग्य मार्गावर आणण्याचा प्रयत्न करू अन्यथा त्यांना दूर करू असं म्हणत शरद पवारांनी भाजपवर टीका केली आहे.