भारत ठरला जगातील दुसऱ्या क्रमांकाचा 5G वापरकर्ता देश; 70% वाढीसह डेटा ट्रॅफिकमध्ये उसळी

भारतातील प्रत्येक वापरकर्ता सरासरी 31GB पेक्षा जास्त मोबाइल डेटा वापरत आहे. 5G ट्रॅफिकमध्ये वर्षागणिक 70 टक्क्यांहून अधिक वाढ नोंदवली आहे.

Untitled Design 10

Untitled Design 10

India becomes the second largest 5G user country in the world : नोकियाच्या मोबाईल ब्रॉडबँड इंडेक्स 2026 अहवालानुसार भारतातील मोबाइल डेटा वापर आणि ब्रॉडबँड ट्रॅफिकमध्ये मोठी झपाट्याने वाढ होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. या अहवालानुसार, भारतातील प्रत्येक वापरकर्ता महिन्याला सरासरी 31GB पेक्षा जास्त मोबाइल डेटा वापरत आहे. तसेच, 5G ट्रॅफिकमध्ये वर्षागणिक 70 टक्क्यांहून अधिक वाढ नोंदवली गेली आहे. सध्या देशातील एकूण मोबाइल ब्रॉडबँड ट्रॅफिकपैकी सुमारे 47 टक्के हिस्सा 5G तंत्रज्ञानाचा आहे.

भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा 5G वापरकर्ता देश ठरला आहे. अहवालानुसार, 2025 मध्ये देशातील मासिक 5G ट्रॅफिक 12.9 एक्साबाइट्स पर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे भारतात 5G वापरकर्त्यांची संख्या झपाट्याने वाढत असून, 5G डेटा वापर आणि 5G फिक्स्ड वायरलेस एक्सेस वापरकर्त्यांच्या बाबतीतही भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. यावरून भारतात 5G तंत्रज्ञानाचा स्वीकार वेगाने होत असल्याचे दिसून येते.

अधिकृत पत्र विरुद्ध व्हायरल पत्र; अक्षय कर्डिले यांना तिकीट, पण सुजय विखेंच्या नावाने पसरली अफवा

मोबाइल ब्रॉडबँडच्या क्षेत्रात सुधारित एन्हान्सड मोबाईल ब्रॉडबँड सेवांचा विस्तार मोठ्या प्रमाणात होत आहे. 2025 मध्ये प्रति वापरकर्ता सरासरी मासिक डेटा वापर 31GB पेक्षा अधिक झाल्याने, AI आधारित अॅप्लिकेशन्स, 4K व्हिडिओ स्ट्रीमिंग आणि क्लाउड गेमिंग यांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढल्याचे स्पष्ट होते. या अहवालानुसार, 2031 पर्यंत भारतातील 5G वापरकर्त्यांची संख्या 1 अब्ज (100 कोटी) पेक्षा जास्त होण्याची शक्यता आहे. विशेषतः महानगर क्षेत्रांमध्ये 5G चा वापर अधिक वेगाने वाढत आहे. या भागांमध्ये एकूण मोबाइल डेटा ट्रॅफिकपैकी 58 टक्के हिस्सा 5G चा आहे.

2025 मध्ये देशातील सक्रिय 4G उपकरणांची संख्या 892 दशलक्ष (89.2 कोटी) इतकी झाली होती. यापैकी 383 दशलक्ष (38.3 कोटी) उपकरणे आधीच 5G सक्षम आहेत. याशिवाय, त्या वर्षात पाठवण्यात आलेल्या 90 टक्क्यांहून अधिक स्मार्टफोनमध्ये 5G सपोर्ट उपलब्ध होता. एकंदरीत, भारतात डिजिटल कनेक्टिव्हिटीचा वेग झपाट्याने वाढत असून 5G तंत्रज्ञान देशाच्या डिजिटल भविष्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे.

Exit mobile version