MEA On Donald Trump : आम्ही काही …, ‘हेलहोल’ वर भारताची पहिली प्रतिक्रिया

MEA On Donald Trump : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड पुन्हा एकदा भारताच्या राजकीय वर्तुळात चर्चेत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी एका

MEA On Donald Trump

MEA On Donald Trump

MEA On Donald Trump : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड पुन्हा एकदा भारताच्या राजकीय वर्तुळात चर्चेत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी एका सोशल मीडियावर पोस्टमध्ये भारतासह चीनबाबत वादग्रस्त टिप्पणी केली आहे. ट्रम्प यांनी भारत आणि चीनला ‘हेलहोल’ असं म्हटलं आहे. ट्रम्प यांच्या या टिप्पणीनंतर आता भारताकडून देखील पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

भारताने डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांना प्रत्युत्तर देताना सावध भूमिका घेतली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या टिप्पणीवर प्रतिक्रिया देत परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले की, आम्ही काही अहवाल पाहिले आहेत. मी एवढेच सांगू शकतो असं माध्यमांशी बोलताना रणधीर जयस्वाल म्हणाले.

परराष्ट्र मंत्रालयाकडून आलेल्या या प्रतिक्रियेनंतर भारताने या प्रकरणात कोणतीही अधिकृत भूमिका न घेण्याचा निर्णय घेतला असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे.

नेमकं प्रकरण काय?

डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या Truth Social या प्लॅटफॉर्मवर एका संभाषणाचा ट्रान्सक्रिप्ट शेअर केला. हे संभाषण अमेरिकेतील कंझर्व्हेटिव्ह टॉक शो होस्ट मायकल सॅवेज यांच्या कार्यक्रमातील होते. या चर्चेत जन्मसिद्ध नागरिकत्व या मुद्यावर बोलताना सॅव्हेज यांनी मोठा दावा केला की, काही व्यक्ती आपल्या मुलांना आपोआप नागरिकत्व मिळावे या उद्देशाने, गरोदरपणाच्या अगदी शेवटच्या टप्प्यात अमेरिकेत येतात. त्यानंतर ते भारत, चीन आणि इतर देशांमधून आपल्या कुटुंबियांना अमेरिकेत बोलावतात. याच संदर्भात हेलहोल हा शब्द वापरण्यात आला होता.

त्यांनी पुढे असा युक्तिवाद केला की, स्थलांतराचे प्रवाह अमेरिकन समाजाचे स्वरूप बदलत आहेत. तसेच त्यांनी अमेरिकन संविधानावर टीका करत त्याला “कालबाह्य” ठरवले.

बंगाल अन् तमिळनाडूत बंपर मतदान; सत्ता बदल होणार की सत्ताधारी मारणार बाजी?-

इराणची प्रतिक्रिया

या वक्तव्यावर इराणकडून देखील प्रतिक्रिया आली आहे. भारताचा बचाव करत हैदराबाद येथील इराणच्या वाणिज्य दूतावासाने एक्सवर लिहिले की, भारत आणि चीन हे संस्कृतीचे पाळणे आहेत. हेलहोल ती जागा आहे जिथे युद्धगुन्हेगार राष्ट्राध्यक्ष इराणच्या संस्कृतीला नष्ट करण्याची धमकी देतात.

Exit mobile version