India Imposed Tariffs On China : भारत सरकारने मोठा निर्णय घेत पुढील तीन वर्षांसाठी चीनसह तीन देशांमधून आयात होणाऱ्या स्टीलवर आयात शुल्क वाढवले आहे. भारत सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार पुढील तीन वर्ष हा कर लागू होणार आहे. सरकारकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार निवडक स्टील उत्पादनांचा समावेश आहे. याचा थेट परिणाम चीन, नेपाळ आणि व्हिएतनामवर होईल.
भारत सरकारच्या अधिसूचनेत म्हटले आहे की तीन वर्षांसाठी हा कर लागू राहील. आयात शुल्क पहिल्या वर्षी 12 टक्के, दुसऱ्या वर्षी 11.5 टक्के असेल आणि तिसऱ्या वर्षी 11 टक्के केले जाईल. हे शुल्क चीन, व्हिएतनाम आणि नेपाळमधून आयात केलेल्या स्टील उत्पादनांना लागू होईल. शिवाय, काही विकसनशील देश आणि स्टेनलेस स्टीलसारख्या विशेष स्टील्सना या शुल्कातून सूट दिली जाईल.
