Download App

विचार करा! एकाच वर्षात भारतात 18 हजार हेक्टरवरील जंगलं साफ; धक्कादायक अहवाल समोर

ग्लोबल फॉरेस्ट वॉचच्या नव्या रिपोर्टमध्ये भारतातील जंगलाबाबत (Indian Forest) धक्कादायक माहिती नमूद करण्यात आली आहे.

Global Forest Watch Report : ग्लोबल फॉरेस्ट वॉचच्या नव्या (Global Forest Watch Report) रिपोर्टमध्ये भारतातील जंगलाबाबत (Indian Forest) धक्कादायक माहिती नमूद करण्यात आली आहे. 2024 मध्ये भारताने तब्बल 18 हजार 200 हेक्टर प्रायमरी फॉरेस्ट (Primary Forest) गमावले आहेत. सन 2001 ते 2024 च्या दरम्यान 2.31 मिलियन हेक्टरवर वनांचं आच्छादन आता संपलं आहे. पूर्वोत्तर राज्यांत सर्वाधिक नुकसान झालं आहे.

भारतात जंगलांची स्थिती दिवसागणिक गंभीर होत चालली आहे. ग्लोबल फॉरेस्ट वॉचच्या अहवालातील धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. 2024 या एकाच वर्षात भारतात 18 हजार 200 हेक्टरवरील जंगलं नष्ट झाली आहेत. 2023 मध्ये हा आकडा 17 हजार 700 हेक्टर होता. म्हणजेच एका वर्षात जंगलं नष्ट होण्याचं प्रमाण वाढल्याचं दिसत आहे.

अहवालात म्हटलं आहे की 2002 ते 2024 दरम्यान भारताने एकूण 3 लाख 48 हजार हेक्टर आर्द्र प्राथमिक जंगले (Humid Primary Forest) गमावली आहेत. देशातील एकूण जंगलांपैकी हा आकडा 5.4 टक्के इतका आहे. 2019 ते 2024 या सहा वर्षांच्या काळात 1 लाख 3 हजार हेक्टरवरील जंगलं नष्ट झाली आहेत. ग्लोबल फॉरेस्ट वॉचनुसार प्रायमरी फॉरेस्ट म्हणजे अशाा प्रकारची नैसर्गिक दाट आणि आर्द्र जंगले जी नजीकच्या काही वर्षांत पूर्णपणे नष्ट केलेली नाहीत. या जंगलांची ओळख उपग्रह इमेज आणि अल्गोरिदमच्या माध्यमातून केली जाते.

‘झुडपी जंगलाची जमीन वनक्षेत्रच’; 86 हजार हेक्टर झुडपी जमिनींचा विकास होणार

आसाममध्ये सर्वाधिक जंगलांचा नाश

शिफ्टिंग शेती, शेतीचे स्थायी विस्तारीकरण, वृक्षतोड, नैसर्गिक संकटे, मुलभूत सोयीसुविधा आणि नागरी वसाहतींसाठी वृक्षतोड या काही महत्वाच्या कारणांमुळे भारतात वने मोठ्या प्रमाणात कमी झाली आहेत. तसं पाहिलं तर याचा सर्वाधिक फटका पूर्वेकडील राज्यांना बसला आहे. सन 2001 ते 2024 दरम्यान आसाममध्ये सर्वाधिक 3.4 लाख हेक्टरवरील वनाच्छादित क्षेत्र नष्ट झालं आहे. यानंतर मिझोरम (3.34 लाख हेक्टर), नागालँड (2.69 लाख हेक्टर), मणिपूर (2.55 लाख हेक्टर) आणि मेघालयातील 2.43 लाख हेक्टरवरील जंगले नष्ट झाली आहेत.

कार्बन उत्सर्जनात वाढ झालीच..

सन 2001 ते 2024 दरम्यान भारतात एकूण 2.31 मिलियन हेक्टरवरील वनाच्छादन नष्ट झालं आहे. यामुळे वातावरणात 1.29 गिगाटन कार्बन डायऑक्साइडचे उत्सर्जन झाल्याचा अंदाज आहे. यामुळे पर्यावरणावर गंभीर परिणाम होत आहे. यातच थोडी दिलाशाची बाब अशी की याच 24 वर्षांच्या काळात भारताने 1.78 मिलियन हेक्टर नवीन ट्री कव्हर तयार केला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या खाद्य आणि कृषी संघटनेनुसार 2015 ते 2020 दरम्यान भारताने दरवर्षी सरासरी 6.68 लाख हेक्टर वनक्षेत्र गमावलं आहे. यामुळे भारत हा जगातील दुसरा वनहानी सहन करणारा देश बनला आहे.

Israel Wildfires: मोठी बातमी! इस्त्रायलच्या जंगलात भीषण आग, आणीबाणी जाहीर

follow us

संबंधित बातम्या