India-Pakistan War : भारत-पाकिस्तान युद्धाचे ढग (India-Pakistan War) मागील महिन्यातील 22 एप्रिलपासून जगाला दिसून येत होते. त्याचं कारण म्हणजे पहलगाम हल्ला. पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या नौदलाने एअर स्ट्राईक करीत दहशतवाद्यांचे अड्डे उध्वस्त केले. पाकिस्तानही अस्वस्थ झाल्याने त्याने भारतावर हल्ले सुरु केले. त्यानंतरच भारत-पाकमध्ये युद्धच सुरु झाल्याचं स्पष्ट झालं. अखेर भारत-पाकिस्तान यांच्यात 86 तासांच्या संघर्षानंतर अखेर शस्त्रसंधी करण्यात आलीयं. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प काश्मीरबाबत तोडगा काढण्यास तयार आहेत. त्यामुळे दोन्ही देशांच्या सहमतीनंतर युद्धबंदीची घोषणा करण्यात आली. आता चर्चा सुरु आहे ती म्हणजे युद्धविरामासाठी पाकिस्तानने आग्रह का केला? याबाबत आपण सविस्तर जाणून घेऊयात…
मोठी बातमी! पाकिस्तानने युद्धबंदीचे उल्लंघन करताच बाडमेर-जैसलमेरमध्ये पुन्हा ब्लॅकआउट; पहा व्हिडिओ
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2025-26 या अर्थिक वर्षाचे बजेट सादर केलंय. या वर्षाचं भारताचं बजेट 50.65 लाख कोटी रुपये आहे. यामध्ये विशेषत; पायाभूत सुविधा, संरक्षण, शिक्षण, आरोग्य आणि कृषी क्षेत्रांसाठी मोठा निधी वाटप करण्यात आलायं. भारताच्या संरक्षण खात्याचं बजेट 75 अब्ज डॉलर्स एवढं असून पाकिस्तानचं 10 अब्ज डॉलर्स एवढं आहे. मनी कंट्रोलच्या अहवालानुसार यंदाच्या वर्षीचं पाकिस्तानचं बजेट 14.46 ट्रिलयन म्हणजेच भारतीय चलननुसार 5.5 लाख कोटी इतकं आहे. या बजेटमध्ये पाकिस्तानने संरक्षण विभागासाठी 1.8 ट्रिलियन एवढ्या निधीचं वाटप केलंय. तर आरोग्य खात्यासाठी 0.2 ट्रिलियन, शिक्षणासाठी 0.88 ट्रिलियन, शेतीसह ग्रामीण विकासावर 0.55 ट्रिलियन रुपये खर्च करण्याची तरतूद केलीयं.
ब्रेकिंग : भारताला मोठं यश! ‘ऑपरेशन सिंदूर’ मध्ये मसूद अझहरच्या मेव्हण्यासह ‘टॉप पाच’ दहशतवादी ठार
भारताचा जीडीपी 3.7 (डॉलर्स) ट्रिलयन एवढा आहे तर दुसरीकडे पाकिस्तानचा 340 (डॉलर्स) अब्ज एवढा आहे. यासोबत भारताचा परकीय चलनसाठी 640 डॉलर्स अब्ज एवढा असून पाकिस्तानकडे परकीय चलनी साठा 10 अब्ज डॉलर्स आहे. भारताच्या जीडीपीमध्ये चांगलीच वाढ होत असून भारताचा रेट 6.5 टक्के एवढा तर पाकिस्तानचा 2 टक्के एवढा आहे. तसेच भारतात महागाईचा दर 5 टक्के आहे तर पाकिस्तानचा 30 टक्के आहे. एवढंच नाही तर भारत देशांतर्गत मोठ्या बाजारपेठा आहेत, त्यामुळे अर्थिक उलाढाल होण्यास मदत मिळते, तेच पाकिस्तानात बाजारपेठा कमी असल्याने पाकिस्तान परदेशी मदतीवरच अवलंबून आहे.
दोन्ही देशांतील बजेटमधील फरक काय?
भारताची अर्थव्यवस्था 3.7 ट्रिलियन डॉलर्सपेक्षा जास्त आहे, तर पाकिस्तानचा जीडीपी अंदाजे 375 अब्ज डॉलर्स आहे.
महसूल : भारताचा महसूल पाकिस्तानपेक्षा अधिक पटीने जास्त आहे. त्यामुळेच भारताचे बजेट पाकिस्तानपेक्षा अधिक आहे.
समाज कल्याण : भारत पाकिस्तानपेक्षा शिक्षण, आरोग्य आणि पायाभूत सुविधांवर जास्त खर्च करतो.
दरम्यान, पाकिस्तानच्या संरक्षण विभागाचं बजेट 2.12 कोटी असूनही त्यांची संरक्षण व्यवस्था पूर्णपणे कोलमडलेली आहे. पाकिस्तानचं हे संरक्षण बजेट त्यांच्या जीडीपीच्या 1.7 टक्के आहे. तर भारताचं बजेट 6.81 लाख कोटी रुपये आहे. या बजेटमध्ये सैन्याच्या आधुनिकीकरणासाठी 1.8 लाख कोटी रुपयांचा समावेश असून भारताचं संरक्षण बजेट हे अंदाजे जीडीपीच्या 1.9 टक्के एवढं आहे. तर ही कारणे होती, भारतासमोर पाकिस्तानने युद्धविरामासाठी आग्रह का केला? या युद्धात भारताला थोड्या प्रमाणात नुकसानीचा सामना करावा लागला पण पाकिस्तानचं झालेलं नुकसान पुढील दशकात भरुन निघेल की नाही, याबाबत शाशंकता आहे, एवढं मात्र नक्की…