IND Vs PAK : सर्वांना उत्सुकता लागली ती भारत पाकिस्तान सामन्याची. (IND Vs PAK) दोन्ही देशांना एकमेकांसमोर उभे ठाकताना पाहण्याची. तसंच, क्रिकेट प्रेमींसह सट्टेबाजही या सामन्याची तितक्याच आतुरतेने वाट पाहत आहेत. भारत आणि पाकिस्तान या दोन संघांमधील हाय-व्होल्टेज सामन्याबाबत सट्टा बाजारात जोश वाढला आहे.
सट्टा बाजाराचा कौल कोणाला
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याला, अगदी इतर कोणत्याही भारतीय संघाच्या तुलनेत, सर्वाधिक प्रेक्षक हजेरी लावतात. अशा परिस्थितीत, सट्टा बाजारही दोन्ही संघांना एकमेकांविरुद्ध खेळताना पाहण्याची दुर्मिळ संधी सोडत नाही. रविवारी, २३ फेब्रुवारी रोजी, चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये जागतिक क्रिकेटमधील सर्वात मोठी स्पर्धा म्हणजेच भारत विरुद्ध पाकिस्तान सामना पाहायला मिळेल. या सामन्याबाबत सट्टेबाजीचा बाजार एक दिवस आधीच तापला आहे.एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार सट्टेबाजी बाजारात भारतीय संघाला सगळ्या जास्त पसंती मिळत असून भारतावर ४१ ते ४२ रुपये भाव लावला जात आहे. एवढेच नाही तर मोठा डाव खेळून आव्हानात्मक धावसंख्येसाठीही भारतीय टीम मजबूत दिसत आहे.
भारत पाकिस्तान भिडणार! जाणून घ्या, कधी अन् कुठे पाहता येईल सामना
४१-४२ च्या शक्यता असताना बुकीने सांगितले की जर कोणी भारताच्या विजयावर १०,००० रुपये लावले आणि भारत जिंकला तर त्याला फक्त ४१०० रुपये मिळतील पण, भारत हरला तर दहा हजार रुपये मिळतील. त्याचवेळी, पाकिस्तानच्या विजयावर ४२०० रुपये लावले आणि यजमान संघ जिंकल्या त्याला १०,००० रुपये मिळतील याउलट पाकिस्तान ठरल्यास सट्टा खेळलेल्याला ४२०० रुपये मोजावे लागतील. कारण सट्टेबाजीच्या बाजारात जो संघ सर्वात जास्त पसंतीचा असतो, म्हणजे ज्या संघाला जिंकण्याची शक्यता जास्त असते, त्याला कमी पैसे मिळतात तर दुसऱ्या संघाला जास्त पैसे मिळतात.
मोठ्या खेळीचा खेळ समजून घ्या
बुकींच्या भाषेत मोठा डाव म्हणजे पहिल्या डावातील एकूण धावसंख्या. सट्टेबाजीच्या बाजारात भारताने पहिले डाव खेळल्यास सट्टेबाजी ३०३/३०७ स्कोअरवर सट्टा लावका तर सट्टेबाज ३०३ स्कोअर न होण्यावर सट्टा खेळतो. अशा स्थितीत, भारताने ३०२ किंवा त्यापेक्षा कमी धावा केल्या तर बिडर जिंकेल आणि भारताने ३०३ किंवा त्याहून अधिक धावा केल्या तर बुकी जिंकेल. त्याचप्रमाणे, एखाद्या सट्टा लावणाऱ्याने ३०७ च्या स्कोअरवर सट्टा लावला आणि भारताने ३०७ किंवा त्याहून अधिक स्कोअर केला तर पैज लावणारा जिंकेल पण भारताने ३०६ किंवा त्यापेक्षा कमी धावा केल्यास बुकी विजेता ठरेल. जो कोणी कोणत्याही रकमेवर सट्टा लावेल, तो रक्कम जिंकेल किंवा हरेल. त्याचप्रमाणे, पाकिस्तानने प्रथम फलंदाजी केली तर २७२/२७६ च्या स्कोअरवर सट्टेबाजी केली जात होती.