Women’s T20 World Cup : भारत पाकिस्तान भिडणार! जाणून घ्या, कधी अन् कुठे पाहता येईल सामना
IND vs PAK in Women’s T20 World Cup : महिला टी 20 वर्ल्डकपला आजपासून सुरुवात (Women’s T20 World Cup 2024) होत आहे. या स्पर्धेतील भारतीय संघाचा (Team India) पहिला सामना न्यूझीलंड विरुद्ध होणार आहे. हा सामना शुक्रवारी दुबईत होणार (Dubai) आहे. यानंतर भारताचा दुसरा सामना पाकिस्तान विरुद्ध (IND vs PAK) होणार आहे. भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यात येत्या ६ ऑक्टोबर रोजी हा सामना होणार आहे. टीम इंडियाचे क्रिकेट चाहते हा सामना टीव्ही आणि मोबाइलवर पाहू शकतील.
या सामन्याचे थेट प्रक्षेपण भारतात टीव्ही चॅनेल्स आणि मोबाइल अॅपवर होणार आहे. स्टार स्पोर्ट्स या चॅनेलवर हा सामना पाहता येणार आहे. हिंदी, इंग्लिशसहीत अन्य भारतीय भाषांत सामन्याची कॉमेंट्री ऐकता येईल. मोबाइल अॅपचा विचार केला तर डिज्नी प्लस हॉटस्टारवर सामना पाहता येईल. टीम इंडियाचा पहिला सामना न्यूझीलंड विरुद्ध होणार आहे तर दुसरा सामना पाकिस्तान विरुद्ध होणार आहे.
या दोन सामन्यांनंतर भारतीय संघाचा तिसरा सामना श्रीलंकेविरुद्ध (IND vs SL) होणार आहे. हा सामना येत्या ९ ऑक्टोबरला होणार आहे. चौथ्या सामन्यात टीम इंडिया ऑस्ट्रेलियाला टक्कर देणार आहे. हा सामना १३ ऑक्टोबरला खेळवण्यात येणार आहे. टीम इंडियाचे सुरुवातीचे तीन सामने दुबईत होणार आहेत. तर चौथा सामना शारजाह शहरात होणार आहे.
२० ऑक्टोबर फायनल सामना
महिला टी २० विश्वकप स्पर्धेतील पहिला सेमी फायनल सामना १७ ऑक्टोबर रोजी दुबईत होणार आहे. दुसरा सेमी फायनल सामना १८ ऑक्टोबरला होणार आहे. हा सामना शारजाहमध्ये होणार आहे. यानंतर २० ऑक्टोबरला सेमीफायनल विजेत्या दोन संघात अंतिम सामना होणार आहे. हा फायनल सामना दुबईत होणार आहे. विश्वकप स्पर्धा आधी बांग्लादेशात होणार होती. परंतु, येथे उसळलेला हिंसाचार पाहता स्पर्धेचे ठिकाण बदलण्यात आले. आता ही स्पर्धा युएईत होत आहे.
याआधी ही स्पर्धा भारतात आयोजित करण्याचीही ऑफर बीसीसीआयला (BCCI) मिळाली होती. मात्र बीसीसीआयने आयसीसीची ही ऑफर नाकारली. त्यामुळे ही स्पर्धा युएईत आयोजित करावी लागली. त्यामुळे आजपासून ही स्पर्धा युएईत होत आहे. या स्पर्धेची सर्व तयारी पूर्ण झाली आहे.
क्रिकेटविश्वात खळबळ! एकाच तासांत दोन कर्णधारांचे राजीनामे; नेमकं काय घडलं?