IND vs AUS : भारत-ऑस्ट्रेलियाचा दुसरा एकदिवसीय सामना रविवारी, जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा पहायचा हा सामना
विशाखापट्टणम: पहिल्या वनडेत ऑस्ट्रेलियाला पराभूत केल्यानंतर भारतीय क्रिकेट संघ आता दुसऱ्या वनडेसाठीही सज्ज झाला आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा वनडे सामना 19 मार्च, रविवारी विशाखापट्टणम येथे होणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 वाजता सुरू होईल. हा सामना स्टार स्पोर्ट्सवर थेट प्रक्षेपित केला जाईल.
संघ बदलण्याची शक्यता आहे
या मालिकेतील पहिल्या एकदिवसीय सामन्यात कर्णधार रोहित शर्मा त्याच्या कौटुंबिक कारणांमुळे उपलब्ध नव्हता, त्यामुळे हार्दिक पांड्याने कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारली होती. मात्र, दुसऱ्या सामन्यात कर्णधार पुनरागमन करेल, अशावेळी इशान किशन संघाबाहेर जाऊ शकतो. याशिवाय खेळपट्टी लक्षात घेता शार्दुल ठाकूरच्या जागी अक्षर पटेलला खेळण्याची संधी दिली जाऊ शकते.
आठवलेंनी केली लोकसभेसाठी ‘एवढ्या’ जागांची मागणी, भाजप करणार का? विचार
भारतीय संघ
शुभमन गिल, इशान किशन (w), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, केएल राहुल, हार्दिक पंड्या (क), रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, युझवेंद्र चहल, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, कुलदीप यादव, उमरान मलिक , जयदेव उनाडकट
दुसऱ्या वनडेसाठी संभाव्य प्लेइंग इलेव्हन
शुभमन गिल, रोहित शर्मा (C), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, केएल राहुल (विकेटकीप), हार्दिक पंड्या रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर/अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी