Download App

“तुमच्या डोक्यावर केस नाही मग तेही चीनला द्यायचं का?”, अमित शाहांनी सांगितला ‘तो’ जुना प्रसंग

एक खासदार महावीर प्रसाद त्यागी म्हणाले होते की 'तुमच्या डोक्यावर केस नाहीत मग तेही चीनला द्यायचं का?'

Amit Shah on Pandit Nehru : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी (Amit Shah) आज संसदेत ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेत (Operation Sindoor) भाग घेत काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. काँग्रेसने इतिहासात केलेल्या (Congress Party) चुकांमुळेच आज दहशतवादाची समस्या उग्र झाली आहे असे ठणकावून सांगितले. याच दरम्यान त्यांनी भारत चीन युद्धाचा (India China War) उल्लेख केला. याचबरोबर जवाहरलाल नेहरू यांचा उल्लेख (Pandit Nehru) करत म्हणाले की नेहरू यांचे डोके माध्यासारखे होते. याचवेळी त्यांनी महावीर प्रसाद त्यागी यांचा उल्लेख केला.

शाह म्हणाले, 1962 च्या युद्धात 38 हजार वर्ग किलोमीटर अक्साई चीनचा हिस्सा चीनला देण्यात आला. या भागात गवताची एक काडी सुद्ध उगवत नाही त्या जमिनीचं काय करणार? नेहरू त्यावेळी म्हणाले होते. नेहरुंच डोकं माझ्यासारखं होतं. एक खासदार महावीर प्रसाद त्यागी म्हणाले होते की ‘तुमच्या डोक्यावर केस नाहीत मग तेही चीनला द्यायचं का?’, खरंतर नेहरुंच्या डोक्यावर केस नव्हते आणि आता गृहमंत्री अमित शाह यांच्या डोक्यावरही केस कमी आहेत.

Operation Sindoor : रायफल कनेक्शन अन् फॉरेन्सिक रिपोर्ट, अमित शाहांनी सादर केले संसदेत पुरावे

यानंतर अमित शाह यांनी इतिहासातील काही घटनांचा उल्लेख केला. 1948 मध्ये भारतीय सैन्याने काश्मिरात निर्णायक आघाडी घेतली होती. सरदार पटेल नाही म्हणत होते पण नेहरुंनी एकतर्फी युद्धविराम जाहीर करून टाकला. 1960 मध्ये सिंधू पाणीवाटप करारातही भौगोलिक आणि रणनीतीच्या दृष्टीने आपण मजबूत स्थितीत होतो. पण या करारात 80 टक्के भारताच्या हक्काचे पाणी पाकिस्तानला देण्यात आले. 1965 च्या युद्धात रणनितीक दृष्टीने महत्वाचा भूभाग भारतीय सैन्याने काबीज केला होता. मात्र 1966 मध्ये हा भूभाग पाकिस्तानला पुन्हा देण्यात आला.

सन 1971 मध्ये इंदिरा गांधींना (Indira Gandhi) पाठिंबा दिला. त्यांनी पाकिस्तानचे दोन तुकडे केले. हा मोठा विजय होता. पण यातही 93 हजार युद्धकैदी आपल्याकडे होते. पाकिस्तान 15 हजार वर्ग किलोमीटर क्षेत्र आपल्याकडे होते. नंतर शिमला करार झाला आणि पीओकेचा सगळा (Pak Occupied Kashmir) प्रकारच उलटा झाला असे अमित शाह यांनी सांगितले.

ऑपरेशन सिंदूर ते अंतराळात फडकला तिरंगा; अधिवेशनाच्या सुरूवात काय म्हणाले पीएम मोदी?

follow us