Pakistan Breaks Ceasefire : अमेरिका राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी मध्यस्थी करुन भारत आणि पाकिस्तानमध्ये (India vs Pakistan) युद्धबंदी केली होती मात्र अवघ्या तीन तासांच्या आत पाकिस्तानने भारतीय सीमेवर हल्ले सुरु केले आहे. पाकिस्तानच्या या हल्ल्यानंतर राजस्थानमधील बाडमेर आणि जैसलमेरमध्ये पुन्हा एकदा ब्लॅकआऊट करण्यात आले आहे. माहितीनुसार, जैसलमेर (Jaisalmer) , बाडमेर (Barmer) आणि पोखरणमध्येही स्फोटांचे आवाज ऐकू आले आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, राजस्थान व्यतिरिक्त जम्मू-काश्मीरमधील उधमपूर आणि श्रीनगरमध्येही मोठ्या स्फोटांचे आवाज ऐकू आले आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये आज युद्धबंदी जाहीर करण्यात आली होती मात्र पुन्हा एकदा पाकिस्तानकडून हल्ले सुरु करण्यात आल्याने राजस्थानच्या जैसलमेर आणि बाडमेर तसेच जम्मू आणि काश्मीर येथील अनेक ठीकाणी ब्लॅकआऊट करण्यात आले आहे.
#WATCH | Rajasthan: A complete blackout has been enforced in the city of Barmer
(Visuals deferred by an unspecified time) pic.twitter.com/OMvS5FG1eP
— ANI (@ANI) May 10, 2025
तर दुसरीकडे जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर आब्दुल्ला यांनी पाकिस्तानवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी एक्स वर पोस्ट करत पाकिस्तानच्या नीयतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. युद्धबंदीचे काय झाले? पुन्हा श्रीनगरमध्ये स्फोटांचे आवाज ऐकू आले आहे. असं ओमर अब्दुल्ला यांनी एक्स वर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. तसेच ही काही युद्धबंदी नाही आहे. श्रीनगरच्या मध्यभागी असलेल्या हवाई संरक्षण तुकड्या नुकत्याच कार्यरत झाल्या आहेत. असेही त्यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे.
मोठी बातमी! ‘या’ दिवशी भारताला मिळणार कसोटीमध्ये नवीन कर्णधार