India Killed Top Fiev Terrorist Under Operation Sindoor : पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतानं राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरमध्ये (Operation Sindoor) पाच मोठ्या दहशवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. या दशतवाद्यांची नावे आता समोर आली आहेत. खात्मा झालेल्या दहशतवाद्यांमध्ये (Terrorist) मुदस्सर खादियान खास उर्फ मुदस्सर उर्फ अबू जुंदाल (लष्कर-ए-तैयबा), हाफिज मुहम्मद जमील (जैश-ए-मोहम्मद), मोहम्मद युसूफ अझहर उर्फ उस्ताद जी उर्फ मोहम्मद सलीम उर्फ घोसी साहब (जैश-ए-मोहम्मद), खालिद उर्फ अबू आकाशा (लष्कर-ए-तैयबा) आणि मोहम्मद हसन खान (लष्कर-ए-तैयबा) अशी भारतानं 7 मे रोजी केलेल्या हल्ल्यात ठार झालेल्या पाच मोठ्या दशतवाद्यांची नावे आहेत.
Details of terrorists killed in the Indian strikes on 7th May in Pakistan: Sources
1) Mudassar Khadian Khas @ Mudassar @ Abu Jundal. Affiliated with Lashkar-e-Taiba. His funeral prayer was held in a government school, led by Hafiz Abdul Rauf of JuD (a designated global…
— ANI (@ANI) May 10, 2025
ठार झालेल्या प्रत्येक दहशतवाद्याची संपूर्ण कुंडली
1. मुदस्सर खादियान खास उर्फ मुदस्सर उर्फ अबू जुंदाल : हा लष्कर-ए-तैयबाचा दहशतवादी मुरीदके येथील मरकज तैयबाचा प्रमुख होता. अबू जुंदालच्या अंत्यसंस्कारात पाकिस्तानी सैन्याकडून गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. जुंदालच्या अंत्यसंस्कारात, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आणि पंजाबचे आयजी (मरियम नवाज) यांनी पुष्पांजली अर्पण केली होती. अंत्यविधीला पाकिस्तानी लष्कराचे सेवारत लेफ्टनंट जनरल आणि पंजाब पोलिसांचे आयजी उपस्थित होते. अबू जुंदालने हा मुंबईत 26/11 रोजी झालेल्या हल्ल्यातील दहशवाद्यांना प्रशिक्षण दिले होते.
2. हाफिज मुहम्मद जमील : जैश-ए-मोहम्मदशी संबंधित जमील हा मौलाना मसूद अझहरचा मोठा मेव्हणा होता. ज्या दिवशी ऑपरेशन झाले, त्या दिवशी जमील बहावलपूरमधील त्याच्या घरी झोपला होता. जमील मरकज सुभानअल्लाहचा प्रभारी होता. जमील हा तरुणांना कट्टरपंथी बनवण्यात आणि जैश-ए-मोहम्मदसाठी निधी उभारण्यात सक्रियपणे सहभागी होता.
India-Pak War : पाकिस्तानला कर्ज देणाऱ्या IMF कडे इतके पैसे कुठून येतात?
3. मोहम्मद युसूफ अझहर : हा जैशचा दहशतवादी उस्ताद आणि मोहम्मद सलीम या नावांनीही ओळखला जात असे. तो मसूद अझहरचा दुसरा मेव्हणा होता. अझहर जैशच्या मदरशात शस्त्रास्त्र प्रशिक्षण देत असे. जम्मूमध्ये झालेल्या अनेक दहशतवादी हल्ल्यांमध्ये अझहरचा सहभाग होता. मोहम्मद युसूफ अझहर हा कंधार विमानतळावर झालेल्या IC 814 विमानाचे अपहरण प्रकरणात वॉन्टेड होता. या अपहरणाचा मोहम्मद युसूफ अझहर हा मास्टर माईंड होता.
4. खालिद उर्फ अबू आकाश : लष्कर-ए-तोयबाचा हा दहशतवादी अफगाणिस्तानातून शस्त्रास्त्रे पुरवत असे. ज्या दिवशी हल्ला झाला त्या दिवशी तो त्याच्या घरात झोपला होता. खालिदवर जम्मूमध्ये दहशत पसरवण्याचा आरोप होता. खालिदचा अंत्यसंस्कार फैसलाबाद येथे झाला, जिथे पाकिस्तानी लष्कराचे वरिष्ठ अधिकारी आणि फैसलाबादचे उपायुक्त उपस्थित होते.
5. मोहम्मद हसन खान : हा जैशचा दहशतवादी पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मधील जैश-ए-मोहम्मदचा ऑपरेशनल कमांडर मुफ्ती असगर खान काश्मिरी याचा मुलगा होता. जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यांचे समन्वय साधण्यात त्याने यापूर्वी महत्त्वाची भूमिका बजावली होती.