India US Trade Deal Benifits to Various filed Tariff reduced from 50% to 18% : भारताच्या उद्योग आणि निर्यात क्षेत्रासाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. कारण भारत आणि अमेरिकेतील व्यापार करार अंतिम टप्प्यात आला आहे. त्यामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावरील लावलेला अतिरिक्त 25 टक्के टॅरिफ कमी करून 18 टक्के पर्यंत आणला आहे. त्यामुळे एकूण 50 टक्के वरून टॅरिफ आता 18 टक्के पर्यंत खाली आला आहे. मात्र आता याचा कोणकोणत्या क्षेत्रांना फायदा होणार आहे. जाणून घेऊ सविस्तर…
ट्रम्प म्हणाले करार झाला, मोदींचं शिक्कामोर्तब नाही
अखेर भारत आणि अमेरिकेतील व्यापार करार अंतिम टप्प्यात आला आहे. कारण हा करार झाल्याचं ट्रम्प यांनी म्हटलं आहे. मात्र पंतप्रधान मोदी यांनी मात्र या करारावर अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. पण याच करारांतर्गत ट्रम्प सरकारने भारतावरील आयात शुल्क घटवून 50 टक्क्यांवरून थेट 18 टक्क्यांपर्यंत कमी केलं आहे. त्यामुळे भारताला आता अमेरिकेमध्ये जाणाऱ्या मालावरील टॅरिफमध्ये तब्बल 32 टक्क्यांची सूट मिळाली आहे.
या क्षेत्रांना होणार फायदा…
दरम्यान या टॅरिफमध्ये झालेल्या घटमुळे अमेरिकेमध्ये मोठा व्यापार करणाऱ्या कंपन्यांमधील स्पर्धा वाढेल. जास्तीत-जास्त ऑर्डर मिळतील आणि परिणामी नफ्यामध्ये वाढ होईल. याचा भारतातून निर्यात होणाऱ्या उत्पादनांना लाभ होईल. कारण 27 ऑगस्टपासून हा कर 50 टक्क्यांवर गेला होता. त्यामुळे अमेरिकन बाजारात भारतीय वस्तू महाग झाल्या होत्या. त्यांची मागणी घटली होती. भारतीय कंपन्यांना वाढीव टॅरिफ आणि तोटा दोन्ही सहन करावा लागत होता. त्यामुळे भारतीय निर्यातदारांना विशेषत: टेक्सटाईल, सीफूड, ऑटो एन्सिलरी, केमिकल्स आणि काही निवडक कन्झ्युमर कंपन्यांना याचा मोठा फायदा होणार आहे.
