Stock Market Today : इराण आणि इस्रायलमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरु असणाऱ्या तणावामुळे (Iran- Israel Conflict) भारतीय शेअर बाजारात देखील घसरण पाहायला मिळत होती मात्र आज आठवड्याच्या शेवटच्या दिवशी भारतीय शेअर बाजारात (Stock Market Today) तेजी दिसून आली आहे. बाजारात आज गुंतवणूकदारांनी 5 लाख कोटी रुपये कमावले आहे. आज, बाजाराच्या सुरुवातीलाच सेन्सेक्सने (Sensex) 800 पेक्षा जास्त अंकांची उडी घेत 81,354 च्या पातळीवरून 82,297 च्या शिखरावर पोहोचला. तर निफ्टी (Nifty) देखील 24,787 वरून 25,078 ला पोहचला होता. तर दुसरीकडे शुक्रवारी सेन्सेक्स 1046.30 अंकांच्या वाढीसह 82,408.17 वर बंद झाला. तर निफ्टी 25,112,40 वर बंद झाला.
शेअर बाजार का वाढला?
स्वस्त खरेदी करण्याची संधी
इराण आणि इस्त्रायल यांच्यात सुरु असणाऱ्या तणावामुळे भारतीय शेअर बाजारात गेल्या तीन दिवसांपासून घसरण पाहायला मिळत होती. ज्यामुळे अनेक शेअर्स स्वस्त झाले होते. त्यामुळे आठवड्याच्या शेवटच्या दिवशी गुंतवणूकदारांना शेअर्स स्वस्तात खरेदी करण्याची संधी मिळाली.
तेल स्वस्त झाले
तर दुसरीकडे आज कच्चा तेलाची किंमत प्रति बॅरल 77 डॉलरवर येताच पुन्हा एकादा बाजारात तेजी दिसून आली. अमेरिकेने इराण आणि इस्त्रायल यांच्यात सुरु असणाऱ्या संघर्षामध्ये सहभागी होणाच्या निर्णय पुढे ढकल्याने आज तेल व्यापाऱ्यांनी नफा कमावला. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, जेव्हापर्यंत तेलाची किंमत 80 डॉलरच्या खाली राहील तेव्हापर्यंत भारतासाठी चांगले आहे.
जालना अतिवृष्टी अनुदान घोटाळा, 11 कर्मचारी निलंबित; जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांची कारवाई
परदेशी गुंतवणूकदारांची खरेदी
आठवड्याच्या शेवटच्या दिवशी भारतीय बाजारात परदेशी गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात खरेदी केली आहे. परदेशी गुंतवणूकदारांनी 19 जून रोजी देखील 935 कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले होते. ज्याचा परिणाम आज बाजारात दिसून आला आहे.