Stock Market : केंद्र सरकारचा गुंतवणूकदारांना धक्का अन् सेन्सेक्स 1,547 अंकांनी घसरला

Stock Market : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज 2026-27 साठी अर्थसंकल्प सादर केेले आहे. या अर्थसंकल्पानंतर भारतीय शेअर बाजारात

Stock Market

Stock Market

Stock Market : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज 2026-27 साठी अर्थसंकल्प सादर केेले आहे. या अर्थसंकल्पानंतर भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळत आहे. केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामण यांनी ऑप्शन्स ट्रेंडिंग अंतर्गत एसटीटी करामध्ये वाढ केल्याने शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली आहे.

या घोषणेनंतर मिडकॅप आणि स्मॉलकॅप (Nirmala Sitharaman) शेअर्सची मोठ्या प्रमाणात विक्री झाली. भांडवली बाजार आणि संरक्षण क्षेत्रात सर्वात जास्त घसरण झाली. आयटी वगळता सर्व बीएसई क्षेत्रीय निर्देशांक घसरले आहे. निफ्टीवर, ओएनजीसी, एसबीआय, हिंडाल्को इंडस्ट्रीज, कोल इंडिया आणि भारत इलेक्ट्रॉनिक्समध्ये सर्वात जास्त घसरण झाली, तर विप्रो, टीसीएस, टायटन कंपनी, मॅक्स हेल्थकेअर आणि इन्फोसिसमध्ये वाढ झाली.

निफ्टी मिडकॅप निर्देशांक 1.8% घसरला आणि स्मॉलकॅप निर्देशांक 2.8% घसरला. आयटी आणि ग्राहकोपयोगी वस्तू वगळता, इतर सर्व निर्देशांक लाल रंगात बंद झाले. सार्वजनिक क्षेत्रातील बँका 4% घसरल्या, तेल आणि वायू 2% घसरल्या आणि भांडवली वस्तू 2% घसरल्या.व्यवहाराच्या शेवटी, सेन्सेक्स 1546.84 अंकांनी घसरून 80,722.94 वर बंद झाला. निफ्टी 495.20 अंकांनी घसरून 24,825.45 वर बंद झाला.

आयआरएफसी, आरव्हीएनएल, आरआयटीईएस आणि रेल्वे शेअर्समध्ये घसरण

केंद्रीय अर्थसंकल्प 2026 मध्ये केलेल्या घोषणांनंतर, रविवार, 1 फेब्रुवारी रोजी भारतीय रेल्वे, आयआरएफसी, आरआयटीईएस, आरव्हीएनएल आणि तितागढ रेल लिमिटेडसह इतर कंपन्यांचे शेअर्स 5% पर्यंत घसरल्या आहेत.

तरुणांना रोजगार नाही, शेतकरी त्रस्त अन्…, अर्थसंकल्पावर नेमकं काय म्हणाले राहुल गांधी?

रेल्वे मंत्रालयाला 2027 च्या आर्थिक वर्षासाठी 2.93 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, जी मागील अर्थसंकल्पात चालू आर्थिक वर्षासाठी वाटप केलेल्या 2.65 लाख कोटी रुपयांपेक्षा 10% जास्त आहे.

Exit mobile version