युद्धामुळे तेलाचा भडका! कच्च्या तेलाच्या किंमती 110 डॉलर प्रति बॅरल पार, जगावर मंदीचं सावट?

Crude oil prices इराण विरूद्ध अमेरिका-इस्त्रायल युद्धामुळे जगभरामध्ये तणावाचे वातावरण पसरले आहे. त्यात कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झाली आहे.

Crude Oil Prices

Crude Oil Prices

Iran Israel War due to Crude oil prices surge cross $110 per barrel, global recession looms : मध्य-पूर्व म्हणजे सध्या आखाती देश इराणमध्ये सुरू असलेल्या इराण विरूद्ध अमेरिका-इस्त्रायल युद्धामुळे जगभरामध्ये तणावाचे वातावरण पसरले आहे. त्यात कच्च तेल निर्मिती करणाऱ्या आखातातून तेल पुरवठ्यावर परिणाम होत असल्याने कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झाली आहे. दुसरीकडे युद्धामुळे तेल उत्पादन देखील कमी करण्यावर भर दिला आहे. आज 9 मार्च 2026 रोजी कच्च्या तेलाच्या किंमतीत तब्बल 18 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे जगावर मंदीचं सावट पसरलं आहे.

कच्च्या तेलाच्या किंमती का वाढल्या?

गेल्या काही दिवसांपासून अमेरिका, इस्त्रायल आणि इराणमध्ये सुरु असणाऱ्या युद्धाचा फटका आता जगाला बसताना दिसत आहे. या युद्धामुळे इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीतून तेल मालवाहू जहाजे बंद केल्याने याचा थेट परिणाम कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर झाला आहे. भारतासह अनेक देशात आता तेलाचा पुरवठा विस्कळीत झाला आहे. त्यामुळे मागणी जास्त आणि पुरवठा कमी असला की किंमक वाढते या नियमानुसार आता जगभरामध्ये क्रुड ऑईलच्या किंमती वाढल्या आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत या किंमतीत 18 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे आता प्रति बॅरल 110 डॉलर एवढे पैसे मोजावे लागणार आहेत.

मोदी ते सुनेत्रा पवार टीम इंडियावर राजकीय नेत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव! कोण, काय म्हणालं?

दरम्यान या कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किंमतींवर बोलताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, ही भाव वाढ काही काळापुरती आहे. युद्ध संपल्यानंतर कच्च्या तेलाच्या किंमती पुन्हा खाली येतील. मात्र तो पर्यंत जगाला शांतता राबवण्यासाठी ही किंमत वाढीची झळ सोसावी लागेल. तर कतारचे उर्जा मंत्री यांच्या वक्तव्यानंतर या वाढीची भीत आणखी वाढली आहे. ते म्हणाले की, युद्ध असेच सुरू राहिले तर कच्च्या तेलाच्या किंमती 150 डॉलर  प्रति बॅरलवर पोहचू शकतात.

 

 

 

Exit mobile version