हाय टेक चोरी! गुगलवरून पॉश एरिया शोधले अन् डल्ला मारला; जयपूरच्या हायटेक चोरीची देशात चर्चा

Jaipur High Tech Theft जयपूरमध्ये चोरी यशस्वी करण्यापूर्वी धूर्त चोरांच्या टोळीने पहिले दिल्लीत एक नंबर प्लेट चोरली आणि...

हाय टेक चोरी! गुगलवरून पॉश एरिया शोधले अन् डल्ला मारला; जयपूरच्या हायटेक चोरीची देशभरात चर्चा

हाय टेक चोरी! गुगलवरून पॉश एरिया शोधले अन् डल्ला मारला; जयपूरच्या हायटेक चोरीची देशभरात चर्चा

Jaipur High Tech Theft : गुगलला काहीही विचारा त्याचं झटक्यात उत्तर मिळतं हे आपल्याला सर्वांनाच अचूक माहिती आहे. आपल्यापैकी अनेकजण याचा वापरही करतात पण, याच गुगलची मदत घेत चोरट्यांनी थोडा थोडका नव्हे तर, तब्बल 25 लाख रूपयांवर डल्ला मारत पोबारा केला असून जयपूरमधील या हायटेक चोरीची सध्या देशभरात जोरदार चर्चा सुरू आहे. नेमकं चोरांनी काय केलं त्याबद्दल जाणून घेऊया…

Video : अजितदादांबद्दलची मुंबईत न सांगितलेली गोष्ट रोहित पवारांनी दिल्लीत जाऊन सांगितली…

दिल्लीतून नंबर प्लेट चोरली अन् मग….

ही घटना 28 जानेवारी रोजी घडली असून, पोलिसांनी आता या प्रकरणात एक महत्त्वाचा खुलासा केला आहे. जयपूरमध्ये चोरी यशस्वी करण्यापूर्वी धूर्त चोरांच्या टोळीने पहिले दिल्लीत एक नंबर प्लेट चोरली आणि ती त्यांच्या कारवर लावली. त्यानंतर या भामट्यांनी जयपूरला प्रवास केला. याप्रकरणी राजस्थान पोलिसांनी दिल्ली आणि उत्तर प्रदेशातून काही जणांना अटक केली आहे.

गुगल मॅपवरून शोधले शहरातील पॉश एरिया

या घटनेचा खुलासा करताना पोलिसांनी सांगितले की, दिल्लीहून कारने आलेल्या पाच धूर्त चोरांनी गुगल मॅप वापरून शहरातील आलिशान भागांचा शोध घेतला आणि नंतर बंद घरांवर डल्ला मारला चोरट्यांनी जयपूरमधील सी-स्कीम परिसरातील भागीरथ कॉलनीत प्रवेश केला. या ठिकाणी असलेले सीसीटीव्ही कॅमेरे तोडत आणि त्यानंतर घरात प्रवेश केला. तीन तास घरात मुक्काम ठोकत या भामट्यांनी कपाटात ठेवलेले 25 लाख रुपये रोख आणि लाखो रुपयांचे सोने-चांदीचे दागिने घेऊन पोबारा केला.

अखेर ‘त्या’ कुख्यात प्रिन्सचा एन्काऊंटर! तब्बल ३०० किलो सोन्याची केली होती लूट

चोरांचा मुसक्या कशा आवळल्या?

शहरातील या घटनेनंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वायुगतीने फिरवली. यासाठी विद्यायकपुरी पोलिस स्टेशन, सायबर सेल आणि जिल्ह्याच्या विशेष पोलिस पथकाने संयुक्त मोहीम राबवली. यासाठी पोलिसांनी जवळपास बसवलेल्या सुमारे 500 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज स्कॅन केले. त्यावेळी अधिकाऱ्यांना एक संशयास्पद कार आढळून आली. तपासात कारचा नंबर ट्रॅक केल्यावर सदर नंबर प्लेट 11 जानेवारी रोजी दिल्लीहून चोरीला गेल्याचे समोर आले. Jaipur High Tech Theft

Video : आत्मनिर्भरतेचं ज्ञान देणाऱ्या भाजप खासदाराचा बेल्ट लाखभर रूपयांचा; नव्या वादाला फुटलं तोंड….

अखेर याप्रकरणी पोलिसांनी शान मोहम्मद उर्फ ​​शानू, शकील अहमद या दोन भामट्यांच्या मुसक्या आवळल्या असून, हे दोघेही अत्यंत कुशल चोर असल्याचे पोलिसांनी सांगितले. यातील शान मोहम्मदवर विविध प्रकरणांमध्ये ३५ हून अधिक गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणातील अन्य तीन भामटे अद्याप फरार असून त्यांचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. 35 हून अधिक गुन्हे दाखल झाले आहेत.

Exit mobile version