Download App

J&K Anantnag Encounter: अनंतनागमध्ये ४८ तासांपासून चकमक सुरू, आणखी एक जवान शहीद

  • Written By: Last Updated:

Anantnag Updates : जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग (Anantnag) जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून लष्कर (Army) आणि दहशतवादी (terrorist) यांच्यात चकमक सुरू आहे. बुधवारी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात ३ जवान शहीद झाले होते. तर आज सकाळी झालेल्या चकमकीत आणखी एक जवान शहीद झाला. अनंतनाग जिल्ह्यात आज सकाळी चकमक झाली. त्यामुळं आता मृतांची संख्या चार झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार दहशतवाद्यांना पकडण्यासाठी गेल्या ४८ तासांपासून सर्च ऑपरेशन सुरू आहे.

बुधवारी अनंतनाग, राजोरी या ठिकाणी भारतीय लष्कराचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत एका कर्नलसह मेजर आणि जम्मू-काश्मिर पोलीस दलातील उपअधिक्षक हे शहीद झाले. तर लष्कराने तीन जवानांचा खात्मा केला होता. त्यानंतर अनंतनागच्या कोकरनाग जंगल परिसराला सुरक्षा दलाच्या जवानांनी वेढा घातला आहे. दहशतवाद्यांना पकडण्यासाठी सर्च ऑपरेशन सुरू आहे. बुधवारपासून हे ऑपरेशन सुरू होते. 48 तासांपासून हे ऑपरेशन सुरू असून 4 अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला आहे.

कर्नल मनप्रीत सिंग, मेजर आशिष आणि डीएसपी हुमायून भट्ट हे शहीद झाले आहेत. तर आज शहीद झालेल्या चौथ्या जवानाची ओळख अद्याप समोर आलेली नाही.

मराठवाड्याला मिळणार 40 हजार कोटींचे पॅकेज? अमृत महोत्सवानिमित्त शिंदे सरकार देणार मोठे गिफ्ट

कर्नल मनप्रीत सिंग आणि मेजर आशिष धोनचॅक यांचे पार्थिक शुक्रवारी सकाळी त्यांच्या पानिपत येथील निवासस्थानी आणण्यात आले. उपअधीक्षक हुमायून भट यांच्यावर बुधवारी त्यांच्या बडगाम येथील निवासस्थानी अंत्यसंस्कार करण्यात आले. चकमकीनंतर भारतीय लष्कराने गुरुवारी मृतदेह श्रीनगरला विमानाने नेले. गुरुवारी सायंकाळी त्यांच्या पार्थिवावर श्रद्धांजली वाहण्यात आली.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवादी ‘द रेझिस्टन्स फ्रंट’ या संघटनेशी संबंधित असल्याचे समजते, जे तैयबाच्या लष्कराशी संबंधित आहे. या भागात दोन-तीन दहशतवादी लपून बसल्याचा सुरक्षा दलांना संशय आहे. लष्कर अनाई पोलिस दलाकडून संयुक्त शोधमोहीम राबविण्यात येत आहे. घनदाट जंगलात शोध मोहिमेवर लक्ष ठेवण्यासाठी आणि मदत करण्यासाठी परिसरात हेरॉन ड्रोन आणि क्वाडकॉप्टर तैनात करण्यात आले आहेत.

Tags

follow us