Jio Platforms IPO : भारतीय शेअर बाजारात आज जिओचा आयपीओ आला आहे. हा आयपीओ येताच बाजारात सर्व विक्रम मोडले आहे. जिओ आयपीओ खरेदीसाठी गुंतवणूकदारांमधील प्रचंड उत्साह दिसून येतोय. जिओ आयपीओ खुला झाल्यानंतर अवघ्या 100 मिनिटांत पूर्णपणे सबस्क्राईब (Fully Subscribed) झाला. जर तुम्हीही या ऐतिहासिक आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्याकडे 23 ऑक्टोबर 2026 पर्यंत वेळ आहे.
शेअर्स मिळवण्याचा सर्वात सोपा आणि स्मार्ट मार्ग
आयपीओमध्ये (IPO) किरकोळ गुंतवणूकदारांना शेअर्स लॉटरी पद्धतीने दिले जातात, त्यामुळे केवळ एका अर्जाद्वारे शेअर्स मिळणे कठीण असू शकते. तुमची शक्यता वाढवण्यासाठी तुम्ही एक स्मार्ट पद्धत वापरू शकता. तुमच्या कुटुंबातील सदस्य (उदा. आई-वडील, भावंडे किंवा जोडीदार) तसेच मित्र-मैत्रिणींनाही या आयपीओसाठी अर्ज करण्यास प्रोत्साहित करा.
Jio Platforms Limited IPO
Price band – ₹1,065 to ₹1,119
Bid/Issue opens on 21st Oct 2026; closes on 23rd Oct 2026
For risk factors and more details, refer to the red herring prospectus dated Oct 14, 2026. https://t.co/sNzkdToW7f
— Reliance Jio (@reliancejio) October 15, 2026
थोरल्या बेगमला शेवटी चोमडेपणा करावा लागला पण … जरांगेंचा रामदास कदमांवर हल्लाबोल
यासाठी फक्त एकच अट आहे की, प्रत्येक व्यक्तीकडे स्वतःचे पॅन (PAN) कार्ड आणि सक्रिय डीमॅट (demat) खाते असणे आवश्यक आहे. तुमच्या कुटुंबातील किंवा ओळखीच्या व्यक्तींच्या नावावर स्वतंत्र अर्ज केल्यास, लॉटरीमध्ये निवडले जाण्याची शक्यता लक्षणीयरीत्या वाढते.
