Download App

Karnataka Assembly Election : भाजपनं भाकरी फिरवली; 52 नव्या चेहऱ्यांना संधी

Karnataka Assembly Election 2023 BJP Candidates List: कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने (BJP)आज आपल्या 189 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा (JP Nadda)यांच्या दिल्लीतील निवासस्थानी झालेल्या बैठकीत ही यादी निश्चित झाली आहे.या बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah)यांच्यासह अरुण सिंग(Arun Singh), धर्मेंद्र प्रधान(Dharmendra Pradhan), मनसुख मांडविया(Mansukh Mandaviya), बीएल संतोष (BL Santosh)हेही नड्डा यांच्या निवासस्थानी उपस्थित होते. बैठकीनंतर केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले की, आज आम्ही आगामी कर्नाटक निवडणुका 2023 साठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर करत आहोत. या 189 उमेदवारांमध्ये 52 नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे.

उद्धव ठाकरे एवढा अहंकार बरा नव्हे… भाजपनं पुन्हा डिवचलं

त्यांनी सांगितले की, मुख्यमंत्री बसवराज बोम्मई शिगगावमधून निवडणूक लढवणार आहेत. याआधीही ते याच ठिकाणी निवडून आले आहेत. कागवाडमधून बाळासाहेब पाटील निवडणूक लढवणार आहेत. गोविंद करजोळ मुदुलमधून, श्रीरामुलू बेल्लारीमधून, मुर्गेश निरानी बिलगीमधून रिंगणात असतील. सीटी रवी यांना चिकमंगळूरमधून तिकीट देण्यात आले आहे. माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांचा मुलगा विजयेंद्र शिकारीपूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहे.

भाजपने म्हटलंय की, नव्या लोकांना संधी दिली आहे. 52 नवीन उमेदवार आहेत. यातील 32 उमेदवार ओबीसी, 30 एससी आणि 16 एसटीचे आहेत. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंह यांनी सांगितले की, 9 डॉक्टर, 31 पदव्युत्तर, 5 वकील, 3 शैक्षणिक, 1 IAS, 1 IPS, 3 निवृत्त अधिकारी आणि 8 महिलांना तिकीट देण्यात आले आहे.

दरम्यान, भाजपचे ज्येष्ठ नेते ईश्वरप्पा यांनी कर्नाटकातील निवडणुकीच्या राजकारणातून ‘निवृत्ती’ घेतली आहे. ईश्वरप्पा यांनी मंगळवारी पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाला सांगितले की त्यांना निवडणुकीच्या राजकारणातून संन्यास घ्यायचा आहे आणि त्यांना 10 मेच्या विधानसभा निवडणुकीत कोणत्याही जागेवरून उमेदवारी देण्याचा विचार करू नका असे आवाहन केले आहे.

Tags

follow us