Download App

कर्नाटकमध्ये झाडांवरुन पैशांचा पाऊस; नेमकं प्रकरण काय?

Karnataka Elections 2023 : आदर्श आचारसंहिता लागू असतानाही कर्नाटक विधानसभा निवडणुकीत (Karnataka Assembly Elections) मोठ्या प्रमाणात पैसा ओतला जात आहे. निवडणूक आयोग (EC) सर्व उमेदवारांवर बारीक लक्ष ठेवून असूनही धाडी टाकत आहेत. याच क्रमाने बुधवारी आयकर विभागाने (Income Tax Department)कर्नाटकातील म्हैसूर येथील काँग्रेस (Congress) उमेदवाराच्या भावाच्या घरावर छापा टाकून एक कोटी रुपयांची रोकड (One crore cash)जप्त केली आहे.

ABP C Voter Survey : शरद पवारांनंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष कोण होणार? सर्वेक्षणात ‘या’ नावाला पसंती

विशेष म्हणजे झाडावरील पेटीत एक कोटी रुपये लपवून ठेवण्यात आले होते. म्हैसूर येथील सुब्रमण्यम राय यांच्या घरावर आयटी अधिकार्‍यांनी छापा टाकला, तेथे झाडावरील बॉक्समध्ये ठेवलेले एक कोटी रुपये जप्त करण्यात आले.


सुब्रमण्य राय हे पुत्तूर मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार अशोक कुमार राय यांचे भाऊ आहेत. या कारवाईचा व्हिडिओही समोर आला आहे. प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, सुब्रमण्यम राय यांनी झाडावरील बॉक्समध्ये पैसे लपवले होते. एक कोटींची रोकड जप्त केल्यानंतर आज दिवसभर आयटी अधिकाऱ्यांनी धाडसत्र सुरुच ठेवले.

सोशल मीडियावर समोर आलेल्या व्हिडिओमध्ये आयटी अधिकारी झाडाच्या फांदीवर ठेवलेल्या बॉक्सची चौकशी करताना दिसत आहेत. हा बॉक्स उघडला असता त्यातून एक कोटी रुपयांच्या कुरकुरीत नोटा निघाल्याचे दिसत आहे.

ज्या झाडाकडून एक कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. ते झाड त्यांच्या बागेच्या मधोमध आहे. घरातील अनेक बॉक्समध्ये पैसे लपवून ठेवल्याची गुप्त माहिती आयकर विभागाला मिळाली होती. पुत्तूरमधून सुब्रमण्यम राय यांचे भाऊ अशोक राय निवडणूक लढवत आहेत, ते दक्षिण कन्नड जिल्ह्यात येते.

Tags

follow us