Download App

अभिमानास्पद! UNESCO च्या जागतिक वारसा यादीत भारतातील 3 मंदिरांचा समावेश

UNESCO : भारतातील कोट्यावधी नागरिकांना अभिमान वाटावा अशी बातमी आली आहे. देशातील तीन मंदिरांना युनेस्कोच्या (UNESCO) जागतिक वारसा यादीत स्थान देण्यात आले आहे. कर्नाटक (Karnataka) राज्यातील बेलूर, हलेबिड आणि सोमनाथपुरा या मंदिरांचा युनेस्कोच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. याआधी पश्चिम बंगालमधील शांतिनिकेतनचाही या यादीत समावेश केला होता. त्यानंतर युनेस्कोने भारतातील आणखी तीन मंदिरांचा या यादीत समावेश केल्याची माहिती आहे. सौदी अरेबियातील रियाध येथे आयोजित करण्यात आलेल्या जागतिक वारसा समितीच्या परिषदेत हा निर्णय घेण्यात आला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी या निर्णयाबद्दल आनंद व्यक्त केला आहे. होयसळ येथील भव्य पवित्र मंदिरे युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट करण्यात आली. होयसळ मंदिरांचे कलातीत सौंदर्य हे भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचा आणि आपल्या पू्र्वजांच्या विलक्षण शिल्प कौशल्याचा पुरावा आहे, असे पीएम मोदी यांनी ट्विट करत म्हटले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी देखील युनेस्कोच्या या निर्णयाबद्दल आनंद व्यक्त केला.

होयसळ येथील हे मंदीर साधारण बाराव्या ते तेराव्या शतकात बांधण्यात आले होते. कला आणि साहित्याचे संरक्षक मानल्या जाणाऱ्या होयसळ राजवंशाची ही राजधानी होती. होयसळांच्या कार्यकाळात राज्यात अनेक मंदिरे बांधण्यात आली. ही मंदिरे अतिशय सुंदर अशीच आहेत. होयसळ येथील तीन मंदिरे भारतीय पुरातत्व सर्वेक्षण अंतर्गत संरक्षित स्मारके आहेत. त्यामुळे या मंदिरांच्या देखभालीवर सरकारचेही लक्ष असतेच.

Maharashtra Rain : बाप्पाच्या स्वागताला पाऊसधारा; ‘या’ जिल्ह्यांत मुसळधार बरसणार

शांतिनिकेतनही युनेस्कोच्या यादीत

याआधी पश्चिम बंगाल राज्यातील शांतिनिकेतनचाही युनेस्कोच्या जागितक वारसा यादीत समावेश करण्यात आला आहे. या ठिकाणी रवींद्रनाथ टागोर यांनी विश्वभारतीची स्थापना केली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा जगभरात भारताचा मान वाढला आहे. कर्नाटकातील तीन मंदिरांचा या यादीत समावेश करण्यात आला आहे. युनेस्कोने घेतलेल्या या निर्णयाचे देशभरातून स्वागत केले जात आहे.

Tags

follow us