Download App

ममता बॅनर्जी नौटंकीबाज, त्यांनी काढलेला मोर्चा हे निव्वळ ‘ढोंग’; मराठमोळ्या अभिनेत्याचे टीकास्त्र

कोलकाता रेप मर्डर प्रकरणातील भगिनीला न्याय मिळावा म्हणून ममता बॅनर्जींनी काढलेला मोर्चा हे निव्वळ 'ढोंग' आहे.

  • Written By: Last Updated:

Kiran Mane : कोलकाता येथील आरजी कर रुग्णालया (RG Kar Hospital एका महिला डॉक्टरवर अत्याचार करून तिची हत्या केल्याची घटना समोर आली. या घटनेने सगळा देश हादरला आहे. या घटनेनंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याविरोधात प्रचंड रोष व्यक्त झाला. त्यानंतर ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी 16 ऑगस्ट रोजी निषेध रॅली काढली. यावरून अभिनेते किरण मानेंनी (Kiran Mane) टीका केली. रेप मर्डर प्रकरणातील भगिनीला न्याय मिळावा म्हणून ममता बॅनर्जींनी काढलेला मोर्चा हे निव्वळ ‘ढोंग’ असल्याचं ते म्हणाले.

Video : मोठी बातमी! MIM च्या पत्रकार परिषदेमध्ये राडा; पहा व्हिडिओ 

 

मानेंनी ट्विटरवर एक पोस्ट केली. त्यात त्यांनी लिहिलं की, कोलकाता रेप मर्डर प्रकरणातील भगिनीला न्याय मिळावा म्हणून ममता बॅनर्जींनी काढलेला मोर्चा हे निव्वळ ‘ढोंग’ आहे. अरे! तुम्ही मुख्यमंत्री आहात मॅडम. पोलीस आणि प्रशासन तुमच्या एका आदेशावर कामाला लागायला पाहिजे. राज्याच्या प्रमुखांनीच आंदोलन आणि धरणे वगैरे करणं यापेक्षा भयाण हास्यास्पद दुसरं काही असू शकत नाही. एक महिला असून या प्रकाराकडे अक्षम्य दुर्लक्ष करणाऱ्या ममताजींचा त्रिवार निषेध!

ममता बॅनर्जी गुन्हेगारांच्या पाठीशी, सत्य दडवलं जातंय…; कोलकाता हत्याप्रकरणावरून भाजपचा आरोप 

मोदी ढोंगीपणाचे बादशहाच!
पुढं त्यांनी लिहिलं की, हा देशच आज इतिहासातील सगळ्यात घृणास्पद कालखंडातून चालला आहे. लाल किल्ल्यावरून भाषण करतांन ‘आम्ही भ्रष्टाचार आणि महिलांवरील अत्याचार खपवून घेणार नाही’ असं म्हणत जणू स्वत:लाच ट्रोल करणारे मोदीसुध्दा ममता बॅनर्जींसाऱखेच असा ढोंगीपणाचे साक्षात बादशहाच!, असं म्हणत मोदींवरही निशाणा साधला.

एकीकडे मणिपूरसारख्या भयानक घटना घडूनही तिकडे न फिरकणाऱ्या… कर्नाटकातील तीन हजार महिलांवर बलात्कार करणाऱ्याला उमेदवारी देणाऱ्या… कुस्तीगीर महिलापटूंचे लैंगिक शोषण करणाऱ्याला वाचवणाऱ्या भ्रष्ट आणि नीच नराधमांनी देशाचं नरडं आवळलंय… तर दुसरीकडे बंगालसारख्या ज्या राज्यातल्या जनतेनं हुशारीनं ही अन्यायी क्रूर पिलावळ दूर ठेवली आणि ममताजींना सत्तेत बसवलं, त्यासुद्धा अशा नौटंकीबाज निघाव्यात हे केवढं दुर्दैव!

भक्तडुक्करपिलावळीला आणि चाटू मीडियाला तर जिथं भाजपे सरकार नाही, तिथलेच फक्त सिलेक्टिव्ह अत्याचार दिसतात. किंवा अत्याचार करणारा मुस्लीम असला तर मात्र यांचं तोंड आणि बुड सगळंचं पेटून उठतं… इतर वेळी यांच्या बहिणींचा रस्त्यात धिंड निघाली तरी हे सत्ताधाऱ्यांची बाजू घेऊन तिला देशद्रोही ठरवत खदाखदा हसतील. अशा नालायक लोकांच्या भवतालात गुरफटलेल्या जनतेनं न्यायासाठी कुणाकडं बघायच? हे असेच चालू राहिलं तर आपल्याकडं श्रीलंका आणि बांगलादेशपेक्षाही भयंकर उद्रेक होऊ शकतो. सत्ताधाऱ्यांनो, जनतेच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका, असं माने म्हणाले.

follow us