Download App

किरेन रिजिजू यांचं पद जाण्याची ‘ही’ आहेत काही प्रमुख कारणं

Kiren Rijiju Portfolio Change: आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत राहणारे केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू (Kiren Rijiju) यांची तडकाफडकी मंत्रीपद काढून घेण्यात आले आहे. त्यांच्या जागी अर्जुन राम मेघवाल ( Arjun Ram Meghwal ) यांची नियुक्‍ती करण्यात आली आहे. त्यांची वक्तव्य त्यांना भोवली असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान किरण रिजिजू यांच्याकडे पृथ्वी विज्ञान मंत्रीपदाची (Minister Of Earth Science) जबाबदारी देण्यात आली आहे. मात्र त्यांच्यावर अत्यंत तातडीनं करण्यात आलेल्या या कारवाईमुळे सध्या राजकीय वर्तुळात मोठ्या चर्चा रंगू लागल्या आहेत. दरम्यान किरेन रिजिजू यांचं मंत्रिपद का काढून घेतलं याची काही कारण आपण जाणून घेऊ

न्यायव्यवस्था आणि सरकारमधील संघर्ष
रिजिजू यांच्या हकालपट्टीचे एक कारण म्हणजे न्यायव्यवस्था आणि सरकारमधील संघर्ष हे देखील आहे. जानेवारीत ते म्हणाले की, न्यायमूर्ती न्याय देण्याऐवजी न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आपला अर्धा वेळ घालवतात. त्याचवेळी त्यांनी असेही म्हटले होते की, न्यायाधीशांना निवडणूक लढवण्याची गरज नाही. त्यांच्या अशाच वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता.

कॉलेजियम सिस्टिमविरुद्ध केलेली वक्तव्य
रिजिजू हे गेल्या काही काळापासून न्यायालयातील नियुक्त्यांबाबत असलेल्या कॉलेजियम सिस्टिमविरुद्ध केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेत होते. देशात कोणीही कोणालाही इशारा देऊ शकत नाही, असेही त्यांनी कॉलेजियमबद्दल म्हटले होते. त्‍यांचे या विधानावर विरोधी पक्षांनी जोरदार टीका केली होती.

न्यायाधीशांबाबत वादग्रस्त वक्तव्य
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. त्यांनी निवृत्त न्यायाधीशांबाबत वक्तव्य केले होते. काही निवृत्त न्यायाधीश आहेत, कदाचित तीन किंवा चार, जे भारतविरोधी गटाचा भाग बनले आहेत. हे लोक भारतीय न्यायव्यवस्था विरोधी पक्षाची भूमिका बजावू पाहत आहेत. देशाच्या विरोधात काम करणाऱ्यांना त्याची किंमत चुकवावी लागेल.

रिजिजू यांची वक्तव्य…पक्षाच्या प्रतिमेला फटका
किरेन रिजिजू हे कायदा मंत्री झाल्यापासून वादग्रस्त ठरले होते. त्यांची अनेक विधाने आणि निर्णय वादग्रस्त ठरले होते. त्यामुळे भाजप पक्षाची प्रतिमाला फटका बसत असल्याचेही बोलले जात होती. सातत्याने वादात अडकल्यामुळे रिजीजू यांचं पद जाणार असल्याची शक्यता आधीच वर्तवली होती. त्यानुसार आज तडकाफडकी त्यांच्याकडून कायदा मंत्रीपद काढून घेण्यात आलं. त्यामुळे सर्वांनाच आश्चर्य वाटलं आहे.

न्यायव्यवस्थेवर दबाव आणण्याचा प्रयत्न
जर आपण संविधानाच्या भावनेने गेलो तर न्यायाधीशांची नियुक्ती करणे हे सरकारचे काम आहे. दुसरी गोष्ट म्हणजे न्यायाधीश आपल्या भावांची न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्याची भारताशिवाय जगात कुठेही प्रथा नाही.सरन्यायाधीश चंद्रचूड यांना अपमानित करण्याचा प्रयत्न झाला. न्यायव्यवस्थेवर दबाव आणण्याचा प्रयत्न किरेन रिजिजू करत होते. मात्र, आपली न्यायव्यवस्था दबावाला बळी पडली नाही.

Tags

follow us