Download App

लालूंच्या कुटुंबीयांकडे 600 कोटींची अवैध संपत्ती, ईडीचा दावा

नवी दिल्ली : लँड फॉर जॉब (Land Jobs Scam) प्रकरणात लालू यादव (Lalu Prasad Yadav) यांच्या कुटुंबीयांकडून आणि जवळच्या मित्रांकडून सुमारे एक कोटी रुपयांची बेहिशेबी रोकड मिळाली आहे. तर सुमारे 600 कोटी रुपयांच्या अवैध व्यवसाय उघडकीस आला आहे.

ईडीने (ED) दावा केला की, छाप्यात 600 कोटी रुपयांचे व्यवहार उघडकीस आले आहेत, तर 1 कोटी रुपयांची बेहिशेबी रोकड जप्त करण्यात आली आहे. ईडीच्या दाव्यानुसार, लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबीयांनी रिअल इस्टेट आणि इतर क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर भांडवली गुंतवणूक केली आहे. त्याचा तपास सुरू आहे.

शुक्रवारी आरजेडीचे माजी आमदार अबू दोजाना यांच्याशिवाय तेजस्वी प्रसाद यादव, रागिणी यादव, हेमा यादव, चंदा यादव, अमित कात्याल, नवदीप सरदाना, प्रवीण जैन आणि अजय कुमार यांच्यावर छापे टाकण्यात आले. तपास यंत्रणेने पाटणा, दिल्ली, रांची, मुंबई, यूपी आणि हरियाणामध्ये एकाच वेळी सुमारे 25 ठिकाणी छापे टाकले होते. या छाप्यात लालू यादव यांच्या मुली आणि मुलगा तेजस्वी यादव यांच्या घरी 70 लाख रोकड, दोन किलो सोने आणि 1900 डॉलर्स सापडल्याचे सांगण्यात येत आहे. जप्त केलेल्या सोन्यात 1.5 किलोचे दागिने आणि 540 ग्रॅम सोन्याचे नाणे आहे.

मी भाजपचा खासदार माझ्या मागे ईडी लागणार नाही, राष्ट्रवादीकडून तो व्हिडिओ व्हायरल

ईडीने आपल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की या छाप्यात सुमारे 600 कोटी रुपयांची गुन्हेगारी रक्कम सापडली आहे. आतापर्यंतच्या तपासात 600 कोटींची मालमत्ता चुकीच्या पद्धतीने मिळविल्याचे निष्पन्न झाले आहे. यामध्ये 350 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता सापडली आहे, तर 250 कोटी रुपयांचे व्यवहार बेनामी लोकांच्या नावावर झाले आहेत.

ईडीने म्हटले आहे की, आतापर्यंत केलेल्या तपासात तत्कालीन रेल्वे मंत्री लालू प्रसाद यादव आणि त्यांच्या कुटुंबियांनी रेल्वेत नोकरी मिळवून देण्याच्या बदल्यात पाटणा आणि इतर भागातील मुख्य ठिकाणांवर अनेक जमिनींची बेकायदेशीरपणे नोंदणी केल्याचे समोर आले आहे. या जमिनींचे सध्याचे बाजारमूल्य 200 कोटींहून अधिक आहे.

Tags

follow us