Download App

काँग्रेस नेते राहुल गांधींनी छत्रपती शिवरायांना अभिवादन केलं; मात्र, ‘या’ शब्दाने नव्या वादाला तोंड

ही फक्त एक मुर्ती नाही, कारण मुर्ती तेव्हा बनवली जाते जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीची विचारधारा, त्यांचं काम मनापासून आत्मसात करतो.

  • Written By: Last Updated:

Rahul Gandhi Greetings to Shivaji Maharaj : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज (Maharaj ) यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रासह देशभरातून त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. दरम्यान, काँग्रेस राष्ट्रीय नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन केलं आहे. मात्र त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंतीच्या दिवशी श्रद्धांजली हा शब्द वापरल्याने भाजप आक्रमक झाला आहे. भाजपकडून माफी मागण्याचीही मागणी केली जात आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो. आपल्या धैर्याने आणि शौर्याने त्यांनी आम्हाला निर्भयतेने आणि पूर्ण समर्पणाने आवाज उठवण्याची प्रेरणा दिली. त्यांचे जीवन आपल्या सर्वांसाठी सदैव प्रेरणादायी राहील अशा शब्दांत राहुल गांधी यांनी शिवरायांना अभिवादन केलं आहे.

भाजपकडून कायदेशीर कारवाईचा इशारा

छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंतीच्या दिवशी राहुल गांधी यांनी श्रद्धांजली अर्पण करणारे ट्विट केले आहे. त्यानंतर भाजपने म्हटले आहे की, महाराष्ट्रातील लोकांचा, महापुरुषांचा राहुल गांधी यांच्याकडून सतत अपमान केला जात असतो. जयंतीच्या दिवशी आदरांजली देतात. परंतु राहुल गांधी महाराष्ट्रातील महापुरुषांच्या विषयी कळत नकळत अनादार व्यक्त करतात. त्यातील हा गंभीर प्रकार आहे. त्यांनी हे ट्विट मागे घ्यावे, अन्यथा त्यांना कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागले, असे भाजपने म्हटले आहे.

Video : छत्रपती शिवराय माझ्यासाठी फक्त नाव नाही, तर..पंतप्रधान मोदींनी शेअर केला एक व्हिडिओ

काही दिवसांपूर्वी कोल्हापूर येथील जाहीर सभेत बोलताना राहुल गांधी यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि संविधानाचं थेट कनेक्शन कसं आहे हे सांगितलं. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण केल्यानंतर सभेत बोलताना राहुल गांधी म्हणाले, “आज आपण इथे शिवाजी महाराजांच्या मुर्तीचं अनावरण करत आहोत.

ही फक्त एक मुर्ती नाही, कारण मुर्ती तेव्हा बनवली जाते जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीची विचारधारा, त्यांचं काम मनापासून आत्मसात करतो. आपण इथे आलो आणि मुर्तीचं अनावरण केलं आणि त्यांनी ज्या गोष्टीसाठी आपलं आयुष्य वेचलं, ते ज्या गोष्टीसाठी आयुष्यभर लढले त्यासाठी आपण लढलो नाही, तर या मुर्तीला काही अर्थ उरत नाही.

त्यामुळे आपण जेव्हा मुर्तीचं अनावरण करतो तेव्हा वचन घेतो की, ते ज्यासाठी लढले, ज्या पद्धतीने लढले ते आपण त्यांच्याएवढं नाही पण आपण थोडतरी थोडं तरी केलं पाहिजे,” असं म्हणत राहुल गांधी यांनी आपण शिवाजी महाराजांचे विचार थोडे तरी आत्मसात करायला पाहिजेत असंही म्हटलं होतं.

follow us