Download App

मोठी बातमी! 1 एप्रिलपासून 19 धार्मिक स्थळांवरील दारूची दुकाने होणार बंद

MP Liquor Ban: मध्य प्रदेश सरकारने (Madhya Pradesh Government) मोठा निर्णय घेत 19 धार्मिक स्थळांवरील दारूची दुकाने बंद करण्याची घोषणा

  • Written By: Last Updated:

MP Liquor Ban: मध्य प्रदेश सरकारने (Madhya Pradesh Government) मोठा निर्णय घेत 19 धार्मिक स्थळांवरील दारूची दुकाने बंद करण्याची घोषणा केली आहे. 1 एप्रिलपासून या निर्णाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. यासाठी सरकारकडून अधिसूचनाही देखील करण्यात आली आहे. काहीदिवसांपुर्वी मुख्यमंत्री मोहन यादव (Mohan Yadav) यांनी शहरी आणि ग्रामीण भागातील 19 धार्मिक स्थळावर दारुची दुकाने पुर्णपणे बंद करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार आता राज्यातील 13 शहरी आणि सहा ग्रामीण संस्थांमध्ये असलेली दारूची दुकाने 1 एप्रिलपासून बंद केली जाणार आहे.

जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, 19 पवित्र क्षेत्रांमध्ये दारूबंदी करण्यात आली आहे, ज्यामध्ये उज्जैन महानगरपालिका, ओंकारेश्वर नगर पंचायत, महेश्वर नगर पंचायत, मंडलेश्वर नगर पंचायत, ओरछा नगर पंचायत, मैहर नगरपालिका, चित्रकूट नगर पंचायत, दतिया नगरपालिका, पन्ना नगरपालिका, मंडला नगरपालिका, मुलताई नगरपालिका, मंदसौर नगरपालिका, अमरकंटक नगर पंचायत, सालकनपूर ग्रामपंचायत, बर्मन कला ग्रामपंचायत, लिंगा ग्रामपंचायत, बर्मन खुर्द ग्रामपंचायत, कुंडलपूर ग्रामपंचायत आणि बंदकपूर ग्रामपंचायत यांचा समावेश आहे.

बार आणि वाइन आउटलेट परवाने दिले जाणार नाही

अधिसूचनेनुसार, 1 एप्रिलपासून या सर्व संस्थांमध्ये कोणत्याही प्रकारच्या बार आणि वाइन आउटलेटचे परवाने दिले जाणार नाहीत आणि त्यांच्या कामकाजालाही परवानगी दिली जाणार नाही. एवढेच नाही तर या संस्थांमध्ये बंद असलेली दारूची दुकाने इतरत्र स्थलांतरित केली जाणार नाहीत.

WPL च्या उद्घाटन समारंभात देशभक्तीचा उत्साह, आयुष्मानची धमाकेदार परफॉर्मन्स

राजभवनाने जारी केलेल्या अधिसूचनेत, ज्या जिल्ह्यांमध्ये हे पवित्र क्षेत्र आहेत त्यांच्यासाठी तरतुदी करण्यात आल्या आहेत आणि दारूची दुकाने बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही नवीन प्रणाली 1 एप्रिलपासून लागू होणार आहे.

follow us