ममता बॅनर्जी यांना मोठा धक्का! तृणमूल पक्षात फूट पाडलेल्या 19 खासदारांची यादी जाहीर

टीएमसीचे लोकसभेतील २८ पैकी २० खासदार आणि राज्यसभेचे १३ पैकी दोन खासदार मिळून एकूण २२ खासदार फुटले आहेत.

News Photo   2026 06 10T184259.287

ममता बॅनर्जी यांना मोठा धक्का! तृणमूल पक्षात फूट पाडलेल्या 19 खासदारांची यादी जाहीर

तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांच्या (TMC) पक्षात अंतर्गत फूट सुरूच आहे. बुधवारी राज्यसभा खासदार सुष्मिता देव यांनी पक्षाचा आणि आपल्या पदाचा राजीनामा दिला. अध्यक्ष सी. पी. राधाकृष्णन यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला. गेल्या तीन दिवसांत तृणमूल काँग्रेसच्या दोन राज्यसभा खासदारांनी पक्ष सोडला आहे. यापूर्वी ८ जून रोजी सुखेन्दु शेखर यांनी राज्यसभेचा राजीनामा दिला होता आणि पक्षाला रामराम केला.

दुसरीकडं टीएमसीचे लोकसभेतील २८ पैकी २० खासदार आणि राज्यसभेचे १३ पैकी दोन खासदार मिळून एकूण २२ खासदार फुटले आहेत. ३ जून रोजी पश्चिम बंगालमधील ८० पैकी ५८ आमदारांनी ऋतब्रता यांच्या नेतृत्वाखाली एक वेगळा गट स्थापन केला आणि त्यांनी ऋतब्रता यांना विरोधी पक्षनेते बनवण्याची शिफारस विधानसभा अध्यक्षांकडं केली. त्यातच ममता यांचे भाचे अभिषेक बॅनर्जी यांनी दिल्लीत राहुल गांधी यांची भेट घेतली. एक दिवसाआधी ममता यांनी सोनिया गांधी यांची भेट घेतली होती.

ठाकरे, पवारांचं झालं तेच ममतादिदींचे होणार ? आमच्यासोबत 50 आमदार, आम्हीच खरी टीएमसी; तृणमूल काँग्रेसमध्ये उघड बंड

टीएमसीमध्ये बंडखोरी केलेले खासदार सयोनी घोष यांचंही नाव असल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. बंगालच्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान सयोनी घोष यांची सर्वाधिक चर्चा होती. सभांमधील त्यांच्या भाषणांमुळे त्यांना ममता बॅनर्जी यांचा पर्याय मानले जाऊ लागले. सयोनी या जादवपूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार आहेत. त्या २०२१ मध्ये तृणमूल काँग्रेसमध्ये सामील झाल्या. २०२१ च्या विधानसभा निवडणुकीत पराभव होऊनही, अभिषेक बॅनर्जी यांनी त्यांची टीएमसीच्या युवा शाखेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती केली.

बगावत केलेल्या खासदारांची यादी

काकोली घोष (बारासात)
जगदीश चंद्र बसुनिया (कूचबिहार)
खाली उर रहमान (जांगीपूर)
युसूफ पठाण, (बेहरामपूर)
अबू ताहिर खान, (मुर्शिदाबाद)
पार्थ भौमिक (बॅरकपूर)
बापी हलधर (मथुरापूर)
सायोनी घोष (जादवपूर)
माला रॉय (कोलकाता दक्षिण)
मिठाली बाग (आरामबाग)
दीपक अधिकारी (घाटाल)
कालीपदा सोरेन (झालग्राम)
जून मालिया (मेदिनीपूर)
अरूप चक्रवर्ती (बांकुरा)
डॉ. शर्मिला सरकार (वर्धमान पूर्व)
शत्रुघ्न सिन्हा (आसनसोल)
असित कुमार माल (बोलपूर)
शताब्दी रॉय (बीरभूम)
रचना बॅनर्जी (हुगळी)

Exit mobile version