Loksabha Election 2024 : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रातील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या 195 उमेदवारांची पहिली यादी आज (2 फेब्रुवारी) जाहीर करण्यात आली. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) पुन्हा वाराणसीमधूनच (Varanasi) निवडणूक लढविणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा गांधीनगरमधून लोकसभेच्या रिंगणात उतरले आहेत.
याशिवाय लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, 34 केंद्रीय मंत्री यांनाही या पहिल्या यादीतून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. (for the upcoming Lok Sabha elections, the first list of 195 candidates of the ruling Bharatiya Janata Party at the Center was announced)
आज भाजपच्या मुख्य कार्यालयात भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी या नावाची घोषणा केली. 195 उमेदवारांमध्ये उत्तर प्रदेशमधील 51, पश्चिम बंगाल 20, मध्य प्रदेश 24, गुजरात 15, राजस्थान 15, केरल 12, तेलंगणा – 9, आसाम – 11, झारखंड – 11, छत्तीसगड – 11 दिल्ली – 5, जम्मू कश्मीर – 2, उत्तरराखंड 3, अरुणाचल प्रदेश 2, गोवा 1, त्रिपुरा 1 आणि अंदमान निकोबार 1 अशा विविध राज्यांमधील नावांचा समावेश आहे. या यादीमध्ये 28 महिला आणि 47 युवा नेत्यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
मात्र पहिल्या यादीतून महाराष्ट्रातील एकाही जागेवरील उमेदवाराची घोषणा झालेली नाही. तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनाही पहिल्या यादीतून डच्चू देण्यात आला आहे. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. भाजपने ज्या 34 मंत्र्यांना पहिल्या यादीत स्थान दिले आहे त्यात केंद्रीय मंत्री अमित शाह, मनसुख मांडविया अशा नेत्यांचा समावेश आहे. गडकरी यांना पहिल्या फळीतील मंत्री मानले जाते. मात्र पहिल्या यादीत त्यांना स्थान न दिल्याने अनेक तर्कवितर्क लढविले जाण्याची शक्यता आहे.
तिकीट कोणाला कुठून मिळाले?
वाराणसी- नरेंद्र मोदी
करीमगंज- कृपानाथ मल्ला
कोरबा – सरोज पांडे
रायपूर – ब्रिजमोहन अग्रवाल
दिल्ली- प्रवीण खंडेलवाल
ईशान्य दिल्ली- मनोज तिवारी
पश्चिम दिल्ली- कंवलजीत सेहरावत
दक्षिण दिल्ली -रामवीर सिंग बिधुरी
नवी दिल्ली- बन्सुरी स्वराज
राजकोट – पुरुषोत्तम रुपाला
गांधी नगर- अमित शहा
अमेठी – स्मृती इराणी
लखनऊ- राजनाथ सिंह
मुझफ्फरनगर – संजीव बालियान
संभल – परमेश्वर लाल सैनी
गोतंबुद्दनगर- महेश शर्मा
मथुरा- हेमा मालिनी
हरदोई- जय प्रकाश रावत
सीतापूर – राजेश वर्मा
बंदा- आरके सिंग पटेल
फतेपूर – साध्वी निरंजन ज्योती
उन्नाव- साक्षी महाराज
श्रावस्ती- साकेत मिश्रा
गोरखपूर – रविकिशन
हमीरपूर – पुष्पेंद्रसिंह चंदेल
आझमगड – दिनेश लाल यादव (निरहुआ)
जौनपूर – कृपा शंकर सिंह
फैजाबाद- लल्लू सिंग
कुशीनगर – विजयकुमार दुबे
BJP releases first list of 195 candidates for Lok Sabha elections pic.twitter.com/ms1zTtzLfL
— ANI (@ANI) March 2, 2024