Download App

Lok Sabha Election : 2024 चे पंतप्रधान कोण? नरेंद्र मोदी की राहुल गांधी? सर्वेतून धक्कादायक आकडेवारी समोर

  • Written By: Last Updated:

Lok Sabha Election 2024 : आगामी वर्षात देशात लोकसभा निवडणुकी (Lok Sabha Election) होणार असून या निवडणुकांसाठी आता सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसल्याचे दिसून येत आहे. लोकसभा निवडणुकीत इंडिया आणि एनडीए (NDA) यांच्यात मोठी लढत होणार आहे. मात्र, पंतप्रधानपदासाठी थेट मतदान झाले, तर देश कोणाला पसंती देईल, याबाबत सी वोटरने एक सर्वेक्षण केलं. त्यात कॉंग्रेस नेते राहुल गांधींना (Rahul Gandhi) कमी पसंती मिळाली.

Horoscope Today: आज ‘या’ राशींना मिळणार चांगली बातमी! मोठा धनलाभ होण्याची शक्यता 

पाच राज्यांतील निवडणुकांनंतर आता सर्वच पक्षांच्या नजरा लोकसभा निवडणुकीकडे लागल्या आहेत. आगामी लोकसभा निवडणुकांपूर्वी जनतेला आकर्षित करण्यासाठी रणनीती आखण्यासाठी भाजप आणि विरोधी इंडिटा आघाडी बैठका घेत आहेत. लोकसभा निवडणुकीत विजय मिळवून भाजप तिसऱ्यांदा केंद्रात सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न करणार आहे. तर दुसरीकडे, विरोधकांची I.N.D.I.A आघाडी भाजपला पराभूत करण्यासाठी आपली पूर्ण ताकद वापरणार आहे. पंतप्रधानपदासाठी कोणाचा चेहरा असेल हे विरोधकांनी अद्याप निश्चित केले नसले तरी नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांच्यात चुरस पहायला मिळू शकते, असं म्हटलं जातं. दरम्यान, सी वोटरने एक सर्वे केला. त्यात पंतप्रधान पदाबाबत एक प्रश्न विचारला. जर थेट पंतप्रधान निवडायचा असेल तर तुमची पसंती कोणाला असेल? याला उत्तर देतांना तब्बल 59 टक्के लोकांनी नरेंद्र मोदींना पसंती दिली.

निवडणुक आयोगाची स्वायत्तता संपली, आयोग सरकारचा गुलाम; प्रकाश आंबेडकरांची टीका 

त्याचवेळी 32 टक्के लोकांनी काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांना पंतप्रधान म्हणून पसंती दिली. 4 टक्के लोकांनी सांगितले की ते यापैकी एकही निवडणार नाहीत. तर 5 टक्के लोकांनी या प्रश्नाचे उत्तर ‘माहित नाही’ असे दिल.

तुम्हाला थेट पंतप्रधान निवडायचा असेल तर तुम्ही कोणाला निवडाल?

नरेंद्र मोदी- 59 टक्के

राहुल गांधी – 32 टक्के

दोन्ही नाही – 4 टक्के

माहित नाही – 5 टक्के

छत्तीसगड आणि मध्य प्रदेशातील जनता काय म्हणत आहे?

प्रत्येक राज्यात लोकांना हे प्रश्न विचारण्यात आले, ज्यामध्ये बहुतेक राज्यांमध्ये लोकांनी पंतप्रधान मोदींना आपली पहिली पसंती दिली आहे. ज्या राज्यांच्या विधानसभा निवडणुका नुकत्याच पार पडल्या त्या राज्यांबद्दल बोलताना छत्तीसगडमधील 67 टक्के लोकांनी सांगितले की, जर त्यांना थेट पंतप्रधान निवडायचा असेल तर ते पंतप्रधान मोदींनाच निवडतील. या राज्यात 29 टक्के लोकांनी राहुल गांधींना पंतप्रधान करण्याला पंसती दिली.

मध्य प्रदेशात 66 टक्के लोकांनी पंतप्रधान मोदींना आपली पहिली पसंती असल्याचे सांगितले. 28 टक्के लोकांना राहुल गांधी पंतप्रधान बनवायचे आहेत.तर राजस्थानमध्ये 65 टक्के लोकांना सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा निवडून आणायचे आहे तर ३२ टक्के लोकांना राहुल गांधींना पंतप्रधान करायचे आहे.

राहुल गांधींच्या कामगिरीबद्दल विचारले असता, 39 टक्के लोकांनी असमाधानी असल्याचे सांगितले. 26 टक्के लोकांनी ते ‘खूप समाधानी’ असल्याचे म्हटलं. तर 21 टक्के लोकांनी ते कमी समाधानी असल्याचे सांगितले. 14 टक्के लोकांनी माहित नाही असे उत्तर दिले.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजप नेत्यांना 2024 च्या लोकसभा निवडणुकीत मिशन मोडवर काम करण्याचे आवाहन केले आहे. नुकत्याच झालेल्या बैठकीत मोदींनी पक्षाच्या नेत्यांना गरीब, शेतकरी, तरुण आणि महिलांवर जास्तीत जास्त लक्ष करा, असं सांगितलं.

Tags

follow us