Download App

‘इंडिया’त मिठाचा खडा! ‘या’ राज्यात काँग्रेसशी आघाडी नाही; ‘आप’ स्वबळावरच लढणार

INDIA Alliance : केंद्रातील भाजप सरकारला सत्तेतून बेदखल करण्यासाठी देशातील विरोधी पक्षांनी एकत्र येत इंडिया आघाडी (INDIA Alliance) स्थापन केली. या आघाडीच्या तीन बैठका झाल्या. आघाडी अभेद्यच आहे आणि पूर्ण ताकदीने भाजपला (BJP) टक्कर देणार असल्याचे सांगितले गेले. मात्र, या विरोधकांची आघाडी किती तकलादू आहे हे आता स्पष्ट होऊ लागले आहे. दिल्ली आणि पंजाबातील सत्ताधारी आम आदमी पार्टीने (AAP) आघाडीला जोरदार धक्का दिला आहे.

पंजाब सरकारमधील मंत्री अनमोल गगन यांनी पत्रकार परिषद घेत पंजाबच्या 13 जागांवर पक्ष स्वतंत्र लढणार असल्याचे जाहीर केले. काँग्रेसबरोबर कोणत्याही परिस्थितीत जागावाटप करणार नाही असे गगन यांनी ठासून सांगतिले. पंजाबमध्ये मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या नेतृत्वात निवडणुका (Lok Sabha Election 2023) लढणार आहोत. आम आदमी पार्टीच्या चिन्हावरच निवडणुका लढणार आहोत. आम आदमी पार्टीच्या या भूमिकेने इंडिया आघाडीला (INDIA Alliance) तडे जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याबाबत न्यूज 18 हिंदीने वृत्त दिले आहे.

INDIA च्या रणनीतीत मोठा बदल; पवारांच्या निवास्थानी ठरणार मास्टर प्लान

राजस्थानातही आप काँग्रेसला झटका देणार ?

दरम्यान, दिल्लीतील निवडणुकीवरूनही केजरीवाल आणि काँग्रेसमध्ये खटके उडाले आहेत. पंजाबमधील काँग्रेस नेत्यांनीही केंद्र सरकारच्या अध्यादेशाविरोधात केजरीवालांना पाठिंबा देण्यास विरोध दर्शवला होता. दिल्लीतील लोकसभा मतदारसंघांच्या मुद्द्यावरून हा वाद वाढला होता. त्यात आता राजस्थानची भर पडली आहे. मध्यप्रदेशातही आप स्वतंत्र लढण्याच्या दिशेने तयारी करत आहे. असे जर घडले तर याचा फटका इंडिया आघाडीला निश्चित बसेल. तसेच आघाडीतील अन्य पक्षांवरही याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.

‘आप’ इंडिया (INDIA) आघाडी सोडून राजस्थानात (Rajasthan Election) स्वबळावर निवडणूक लढण्याची तयारी करत आहे. पक्षाचे राजस्थान प्रभारी विनय मिश्रा यांनीच काही दिवसांपूर्वी दिली होती. राजस्थान विधानसभेच्या जागा अ,ब आणि क अशा तीन भागात विभागल्या आहेत. अ श्रेणीत पक्षाचे उमेदवार पूर्ण ताकदीनिशी निवडणुकीत उतरतील. ब श्रेणीत जिथे तयारी आहे पण, उमेदवारांबाबत संभ्रम आहे आणि क श्रेणीत आतापर्यंत एकही उमेदवार समोर आलेला नाही, अशी माहिती मिश्रा यांनी दिली होती.

Tags

follow us