Lok Sabha Election Result : लोकसभेचा निकाल लागलाय. मात्र, कुणाकडं पुरेसं संख्याबळ नसल्यामुळं काँग्रेस सत्तास्थापनेसाठी (Lok Sabha Election) आक्रमक पवित्रा घेण्याच्या भूमिकेत नाही. त्यासोबतच घाईघाईत सरकार स्थापन करण्याचं प्रयत्न अंगलट येऊ शकतात, असे डाव्यांचेही मत आहे. पण इंडिया आघाडीतील इतर पक्ष मात्र सरकार स्थापनेसाठी हालचाली करत असल्याच दिसून आहेत. लोकसभा निवडणुकीबाबत जे एक्झिटपोल समोर आले होते. त्या पोल्सच्या एकदम वेगळा निकाल लागले आहेत.
भाजपाने 400 पार’चा नारा दिला होता. मात्र, मतदारांना भाजपला 240 जागांवरच थांबवलं आहे. त्यामुळे जरी भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरी स्वबळावर सत्ता स्थापन करण्याची त्यांनी योजना फोल ठरली आहे. त्यांना जेडीयू आणि टीडीपी या पक्षांशी निवडणूकपूर्व आघाडी केल्याशिवाय सरकार स्थापन करणं अवघड आहे. दुसरीकडे इंडिया आघाडीने मात्र सबुरीने घेत योग्य वेळी योग्य पाऊले उचलू, अशी भूमिका घेतली आहे. मात्र, इंडिया आघाडीतील काही पक्ष विशेषतः तृणमूल काँग्रेस आणि शिवसेना उबाठा काही प्रमाणात आम आदमी पक्ष हे भाजपाला शह देण्यासाठी प्रयत्नशील आहेत असंही समोर येत आहे.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी निवडणूक निकालाच्या दिवशी समाजवादी पक्षाच्या अखिलेश यादव यांच्याशी संवाद साधला होता. अखिलेश यादव यांनी चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांच्याशी संपर्क साधून त्यांना इंडिया आघाडीत येण्यासाठी निमंत्रीत कराव असं तृणमूलकडून सूचित करण्यात आलं होतं. अखिलेश यादव यांचे वडील मुलायम सिंह यादव आणि नितीश कुमार यांचे जवळचे संबंध होते. दोन्ही नेत्यांनी नव्वदीच्या दशकात एकत्र काम केलं असून समाजवादी विचारांतून त्यांनी आपल्या राजकारणाची सुरुवात केली होती.
महायुतीला धोक्याची घंटा! लोकसभा निवडणुकीत ‘164’ विधानसभा मतदारसंघांमध्ये ‘मविआची’ सरशी
गुरुवारी ममता बॅनर्जी यांचा भाचा अभिषेक बॅनर्जी आणि तृणमूल काँग्रेसचे वरिष्ठ नेते डेरेक ओब्रायन यांनी नवी दिल्लीत अखिलेश यादव यांची भेट घेतली. आम आदमी पक्षानेही सरकार स्थापन करण्याच्या अनुषंगाने आणखी पक्षांना एकत्र आणण्याची रणनीती आखली आहे. ‘आप’चे नेते संजय सिंह आणि राघव चढ्ढा यांनीही बॅनर्जी यांची भेट घेतली. तसंच, तृणमूलच्या बॅनर्जी आणि ओब्रायन यांनी दिल्लीत शिवसेना नेते संजय राऊत यांचीही भेट घेतली.
त्यानंतर त्यांनी मुंबईला जाऊन मातोश्री येथे शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांचीही भेट घेतली. त्यानंतर या भेटीवर बोलताना अखिलेश यादव म्हणाले, लोकशाहीत आशा कधीही पल्लवीत असल्या पाहीजेत. जर कुणाला खूश करून सरकार स्थापन होत असेल, तर हाच आनंद दुसरेही देऊ शकतात. लोकशाहीत मतमोजणी झाल्यानंतरही आशा आणि अपेक्षा संपलेल्या नसतात. त्यामुळे आशेचा किरण जागृत आहे असं सूचक विधान त्यांनी केल्याने तर्क-वितर्क लावले जात आहेत.
दुसरीकडे काँग्रेस मात्र सरकार स्थापनेच्या अनुषंगाने आक्रमकरित्या विचार करत नसल्याचं दिसत आहे. इंडिया आघाडीकडे सध्या पुरसं संख्याबळ नाही. डाव्या नेत्यांचेही हेच मानने आहे की, संख्याबळ नसतानाही सरकार बनवण्यासाठी केलेला प्रयत्न अंगलट येण्याची शक्यता आहे. नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांच्यासाठी इंडिया आघाडीची दारं उघडी ठेवायची, असा काँग्रेसचा विचार आहे.
तृणमूल काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितलं की, ‘नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपाने 10 वर्ष सरकार चालवलं. मात्र, आता जनतेने नरेंद्र मोदी आणि भाजपाला नाकारलं आहे. त्यामुळे हीच वेळ आहे जेथे आपण सरकार स्थापनेसाठी प्रयत्न केले पाहीजेत. त्यामुळे काँग्रेस जरी इच्छूक नसलं तरी इतर पक्ष मात्र सरकार स्थपानेसाठी आघाडीवर आहेत असं यामधून समोर येतय.