Download App

LPG Price Hike : दिवाळीआधीच दणका! LPG गॅसच्या दरात मोठी वाढ

LPG Price Hike : दिवाळीचा सण अगदी तोंडावर आला आहे. या काळातही महागाई (LPG Price Hike) कमी होण्याची शक्यता दिसत नाही. नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच सर्वसामान्यांच्या खिशाला झटका (Inflation) बसला आहे. तेल कंपन्यांनी एलपीजी गॅस सिलिंडरचे दर सुधारीत केले असून यामध्ये वाढ झाली आहे. आजपासून गॅस सिलिंडरच्या दरात 100 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. यामुळे मुंबईत व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत 1785.50 रुपये झाली आहे. दिवाळीआधीच तेल कंपन्यांनी हा निर्णय घेतला आहे. ही दरवाढ फक्त कमर्शिअल गॅसच्या बाबतीत झाली आहे. घरगुती गॅसचे दर जैसे थे ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे व्यावसायिक गॅसचा वापर करणारे हॉटेल व्यावसायिक, खाद्यपदार्थ विक्रेते यांना झटका बसला आहे. त्यामुळे ऐन सणासुदीच्या काळात खाद्य पदार्थांचे दर वाढू शकतात.

मराठवाड्यात कुणबी दाखल्यांचा मार्ग मोकळा; राज्य सरकारकडून GR निघाला

आज 19 किलोच्या एलपीजी गॅसच्या दरात 100 रुपयांपेक्षा जास्त वाढ झाली आहे. दिल्लीत आज 19 किलो गॅस टाकीची किंमत 1833 रुपयांत मिळेल. कोलकाता शहरात 1943 रुपये मुंबई शहरात 1999.50 रुपये इतकी झाली आहे. मागील महिन्यापासून गॅसच्या दरात जवळपास 209 रुपये इतकी वाढ झाली आहे. म्हणजेच एकाच महिन्यात ही मोठी दरवाढ झाली आहे. मागील महिन्यात कोलकात्यात 203.50 रुपये दर वाढले होते. या महिन्यातृ 103.50 रुपये वाढ झाली आहे. म्हणजेच 31 दिवसांत गॅस सिलिंडर जवळपास 307 रुपयांनी वाढ झाली आहे.

मुंबईत ग्राहकांना जवळपास 202 रुपयांचा झटका बसला आहे. आज आणखी 101.50 रुपये वाढ झाली आहे. एकाच महिन्यात सिलिंड 303.50 रुपयांनी वाढला आहे. आज चेन्नई शहरात 101.50 रुपयांनी गॅसचे दर वाढले आहेत. म्हणजेच एका महिन्या 304.50 रुपयांनी गॅसच्या दरात वाढ झाली आहे.

चंद्राबाबू नायडू 52 दिवसांनंतर तुरुंगातून बाहेर; उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर

घरगुती गॅसच्या दरात वाढ नाही 

या दरवाढीतून घरगुती गॅसधारकांना दिलासा मिळाला आहे. या गॅसच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. दोन महिन्यांपासून घरगुती गॅसच्या दरात वाढ झालेली नाही. याआधी ऑगस्ट महिन्यात दर कपात करण्यात आली होती. इंडियन ऑईल कंपनीच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, 14.2 किलो घरगुती एलपीजी सिलिंडर ऑगस्ट महिन्यातील दरावरच मिळत आहे. दिल्लीत 903 रुपये, कोलकात्यात 929 रुपये, मुंबईत 902.50 रुपये तर चेन्नई 918.50 रुपये या दरांत घरगुती गॅस मिळत आहे.

सप्टेंबरमध्येही दरात केली होती कपात

दरम्यान, याआधी 1 सप्टेंबर रोजी व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या (Commercial LPG Cylinder ) किंमती कमी करण्यात आल्या होत्या. 1 सप्टेंबरपासून व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडर 157 रूपये कमी किंमतीत मिळत होता. व्यावसायिक गॅस सिलेंडर हा 19 किलोंचा असतो. व्यावसायिक गॅसच्या किंमती कमी केल्याने अप्रत्यक्षपणे नागरिकांनाही दिलासा मिळाला होता. आता मात्र या महिन्यात थेट दोनशे रुपयांनी वाढ करत सरकारने हा दिलासा फार काळ टिकू दिला नाही.

Tags

follow us