Khargone Bus Accident : मध्यप्रदेशात मोठा अपघात; 50 फूट नदीत बस कोसळली, 15 जणांचा मृत्यू

Khargone Bus Accident : मध्यप्रदेशातील खरगोन जिल्ह्यात मोठा अपघात झाला आहे. बोराड नदीवरील पुलावरून एक प्रवासी बस 50 फूट खाली कोसळून हा अपघात झाला आहे. या भीषण अपघातामध्ये 15 जणांचा मृत्यू झाला असून, अनेकजण जखमी झाले आहेत. अपघाताची तीव्रता बघता मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सध्या घटनास्थळी मदत आणि बचावकार्य युद्धपातळीवर सुरू […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out (94)

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out (94)

Khargone Bus Accident : मध्यप्रदेशातील खरगोन जिल्ह्यात मोठा अपघात झाला आहे. बोराड नदीवरील पुलावरून एक प्रवासी बस 50 फूट खाली कोसळून हा अपघात झाला आहे. या भीषण अपघातामध्ये 15 जणांचा मृत्यू झाला असून, अनेकजण जखमी झाले आहेत. अपघाताची तीव्रता बघता मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सध्या घटनास्थळी मदत आणि बचावकार्य युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. या अपघातात बसचा चालक, कंडक्टर आणि क्लिनरचाही मृत्यू झाल्याची माहिती आहे. या अपघातानंतर मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दुर्घटनेवर शोक व्यक्त केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त बस खरगोनहून इंदूरला निघाली होती. त्यावेळी अचानक खरगोन-ठीकरी मार्गावरील बोराड नदीवरील पुलावरून ही बस खाली कोसळली. अपघातावेळी बसमध्ये 35 हून अधिक प्रवासी होते. घटनेची माहिती मिळताच गावकरी मदतीसाठी धावले. या पुलावरून अनेक बस चालक भरधाव वेगाने वाहने चालवतात. अनेकदा सांगूनही चालक न ऐकता दादागिरी करतात असे गावकऱ्यांनी सांगितले.

मोठी कारवाई! पुण्यात तीन कोटीहून अधिकची रोकड जप्त

आर्थिक मदत जाहीर 

या भीषण अपघातानंतर घटनास्थळी सध्या मदत आणि बचावकार्य युद्धपातळीवर सुरू करण्यात आले असून, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी शोक व्यक्त करत अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना आणि जखमींना आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना 4 लाख रुपये, गंभीर जखमींना 50 हजार रुपये, किरकोळ जखमींना 25 हजार रुपयांची आर्थिक मदत मध्य प्रदेश सरकारने जाहीर केली आहे.

Exit mobile version