Download App

महात्मा गांधींच्या पणतू नीलमबेन पारीख यांचं निधन, वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

नीलमबेन, महात्मा गांधींच्या उत्तराधिकारी असण्यासोबतच, त्यांच्या विचारसरणीनुसार जगणाऱ्या आणि काम करणाऱ्यांमध्ये देखील

  • Written By: Last Updated:

Neelam Ben Parikh Passes Away : महात्मा गांधी यांच्या पणतू नीलम बेन पारीख यांचं निधन झालं आहे. वयाच्या ९३व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. नवसारीच्या अलका सोसायटीत राहून (Neelam Ben) त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य दयाळूपणा, सेवा आणि समाजसेवेसाठी समर्पित केलं होतं.

भाजपला मदत करणाऱ्या नेत्यांना पक्षाबाहेर हाकलणार; राहुल गांधी चिडले, दिला हा इशारा

नीलमबेन पारीख या महात्मा गांधी यांचे पुत्र हरिदास गांधी यांच्या वंशज होत्या. आई रामीबेन आणि वडील योगेंद्रभाई पारीख यांच्या मूल्यांनी प्रभावित होऊन त्यांनी लहानपणापासूनच गांधीवादी मूल्ये आत्मसात केली. त्यांनी महिलांच्या कल्याणासाठी आणि शिक्षणासाठी अनेक प्रयत्न केले. त्या विविध सामाजिक संस्थांशी संबंधित होत्या आणि महिला शिक्षण, स्वावलंबन आणि आरोग्य क्षेत्रात त्यांनी महत्त्वपूर्ण काम केलं.

नीलमबेन यांची अंतिम यात्रा

आज २ एप्रिल रोजी सकाळी ८:०० वाजता त्यांचे पुत्र डॉ. समीर पारीख यांच्या निवासस्थानापासून अंत्ययात्रेला सुरूवात होईल आणि वेरावळ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांच्या निधनाने समाजाने एक प्रामाणिक आणि सेवाभावी व्यक्तिमत्व गमावलं आहे.

गांधी कुटुंबातील त्यांची भूमिका

नीलमबेन, महात्मा गांधींच्या उत्तराधिकारी असण्यासोबतच, त्यांच्या विचारसरणीनुसार जगणाऱ्या आणि काम करणाऱ्यांमध्ये देखील गणल्या जातात. त्यांच्या आयुष्यातील विविध घटना लोकांसाठी प्रेरणास्त्रोत ठरल्या आहेत. त्यांनी आयुष्यभर केवळ स्वतःसाठीच नाही तर समाजातील वंचित आणि दुर्बल घटकांसाठीही अथक परिश्रम केले. त्यांच्या निधनाने देशाने एक चांगले व्यक्तिमत्व कायमचे गमावले आहे अशी भावना त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींनी व्यक्त केली.

follow us

संबंधित बातम्या