Mahua Moitra : आपल्या तडाखेबाज भाषणांनी प्रसिध्द असलेल्या तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा (Mahua Moitra) यांच्या अडचणीत सातत्याने वाढ होत आहे. संसदेत प्रश्न विचारण्याच्या बदल्यात रोख रक्कम घेतल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. विशेषत: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) यांना टार्गेट करण्यासाठी त्यांनी इतर व्यावसायिकांकडून पैसे घेतले आहेत, असा आरोप जप खासदार निशिकांत दुबे यांनी उपस्थित केला होता. त्यानतंर आता मोइत्रा यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. तर या प्रकरणात दर्शन हिरानंदानी यांनी मोईत्रा यांना रोख रक्कम दिल्याचा आरोप आहे.
Manoj Jarange यांच्या सभेत तरूणाचा धमकी देत गोंधळ; म्हणाला मला बोलू द्या नाहीतर…
हिरानंदानी ग्रुपचे सीईओ दर्शन हिरानंदानी यांनी अदानी समूहाला लक्ष्य करणारे प्रश्न उपस्थित करण्यासाठी महुआ मोईत्रा यांना रोख रक्कम दिली होती. त्यांच्या प्रतिज्ञापत्रानुसार, हिरानंदानी यांनी अदानी समूहाविषयी प्रश्न विचारण्यासाठी मोइत्रा यांच्या संसदीय लॉगिनचा वापर केल्याचे मान्य केले. ते म्हणाले की, आपण काही प्रश्न मोईत्रा यांच्या अकाऊंटवर अपलोड केले होते. मोईत्रा या गौतम अदानी यांना लक्ष्य करून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्ला करू इच्छित असल्याचा दावा हिरानंदानी यांनी केला.
मोइत्रा हिरानंदानींची जवळची वैयक्तिक मैत्रीण
हिरानंदानी सांगतात की ते खासदार महुआ मोईत्रा यांना 2017 पासून ओळखतात. हे दोघे बंगाल ग्लोबल बिझनेस समिटमध्ये भेटले होते, जेव्हा मोईत्रा आमदार होत्या. हिरानंदानी यांच्या म्हणण्यानुसार, टीएमसी खासदार गेल्या काही वर्षांपासून त्यांच्या जवळच्या मैत्रीण बनल्या होत्या. मोइत्राच्या माध्यमातून आपला व्यवसाय वाढवता येईल, हा हिरानंदानी यांचा उद्देश होता. हिरानंदानी यांच्या म्हणण्यानुसार, यानंतर मोइत्रा यांनी संसदीय निवडणूक लढवण्याचा इरादा व्यक्त केला. त्यानंतर 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्या पश्चिम बंगालच्या कृष्णनगरमधून खासदार म्हणून निवडून आल्या.
चर्चेत राहण्यासाठी मोदी-अदानींवर निशाणा
चर्चेत राहण्यासाठी महुआ मोइत्रा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर वैयक्तिक हल्ला करण्याची योजना बनवली. त्यांच्या मित्रांनी आणि सल्लागारांनी त्यांना असे करण्याचा सल्ला दिला.
दुबेंचं ओम बिर्ला यांना पत्र
या दाव्यांच्या आधारे भाजप खासदार निशिकांत दुबे आणि जय अनंत देहादराई यांनी महुआ मोईत्रा यांच्यावर संसदेत प्रश्न विचारण्यासाठी लाच घेतल्याचा आरोप केला. विशेषाधिकाराचा भंग, सभागृहाचा अवमान आणि इतर कथित गुन्ह्यांमध्ये त्यांचा सहभाग असल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यांनी ओम बिर्ला यांना पत्र लिहून या प्रकरणाची चौकशी करण्याची आणि महुआ मोइत्रा यांना सभागृहातून तत्काळ निलंबित करण्याची मागणी केली आहे.
एजन्सीने अदानी प्रकरणाची चौकशी करावी, मग मला प्रश्न विचारा- मोईत्रा
या आरोपांना प्रत्युत्तर देताना, TMC खासदार मोईत्रा म्हणाल्या की मनी लॉन्ड्रिंगच्या CBI चौकशीचे स्वागत केले असते, परंतु एजन्सीने अदानीच्या कथित ऑफशोअर मनी ट्रेल, ओव्हर-इनव्हॉइसिंग आणि बेनामी खात्यांचा तपास पूर्ण केला नाही. मोइत्रा यांनी निशिकांत दुबे यांना कायदेशीर नोटीस पाठवली असून त्यांचे आरोप खोटे आणि बदनामीकारक असल्याचे म्हटले आहे.
मोईत्रा यांनी त्यांच्याविरुद्ध दिल्ली उच्च न्यायालयात मानहानीचा खटला दाखल केला आहे. त्यांनी न्यायालयाला भाजप खासदारांना त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून पोस्ट, ट्विट, री-ट्विट्स, काढून टाकण्याचे निर्देश देण्यास सांगितले आहे.