मोठी बातमी, मैथिली ठाकूर भाजपमध्ये सामील, अलीनगरमधून निवडणूक लढवणार ?

Maithili Thakur Joins BJP :  लोकगायिका मैथिली ठाकूर यांनी मंगळवारी 14 ऑक्टोबर रोजी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. बिहार भाजप प्रदेशाध्यक्ष

Maithili Thakur Joins BJP

Maithili Thakur Joins BJP

Maithili Thakur Joins BJP :  लोकगायिका मैथिली ठाकूर यांनी मंगळवारी 14 ऑक्टोबर रोजी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. बिहार भाजप प्रदेशाध्यक्ष दिलीप जयस्वाल यांच्या उपस्थितीमध्ये मैथिली ठाकूरने भाजपमध्ये प्रवेश केला आहे. सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, मैथिली दरभंगा येथील अलीनगरमधून विधानसभा निवडणूक लढवू शकते. भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे यांनी काही दिवसांपूर्वी मैथिली यांची भेट घेतली होती तेव्हापासून मैथिली भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होती.

मला बिहारच्या विकासात योगदान द्यायचे : मैथिली

भाजपात सामील होण्यापूर्वी मैथिली म्हणाली, “मी एनडीएला पाठिंबा देते आणि भाजप नेहमीच माझे प्राधान्य राहिले आहे. माझा आत्मा बिहारशी जोडलेला आहे. मला बिहारमध्ये राहून लोकांची सेवा करायची आहे आणि विकासात योगदान द्यायचे आहे. असं माध्यमांशी बोलताना मैथिली (Maithili Thakur Joins BJP) म्हणाली. तिने एएनआय वृत्तसंस्थेला सांगितले, माझे ध्येय निवडणूक लढवणे नाही. पक्ष जे काही सांगेल ते मी करेन.

25 वर्षीय लोकगायिका मैथिली दरभंगाची रहिवासी आहे. तिचे वडील रमेश ठाकूर आणि आई भारती ठाकूर हे मैथिली संगीतकार आहेत. तिचे दोन्ही भाऊही मैथिलीसोबत संगीत मैफिलीत दिसतात.

तोपर्यंत नोकर भरती करु नका, मनोज जरांगे पाटलांचा राज्य सरकारला इशारा 

तर दुसरीकडे बिहार विधानसभा निवडणुकीत भाजप 101 जागांवर निवडणूक लढवणार असून आज भाजपकडून 71 उमेदवारांची पहिली लिस्ट देखील जारी करण्यात आली आहे. तर मुख्यमंत्री मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा पक्ष जेडीयु 102 जागांवर निवडणूक लढवणार आहे. तर चिराग पासवान यांचा पक्ष 29 जागांवर निवडणूक लढवणार आहे.

Exit mobile version