राम मंदिर ट्रस्टचा मोठा निर्णय! नवे CEO म्हणून एअर मार्शल जितेंद्र मिश्रांची नियुक्ती

Air Marshal Jitendra Mishra new CEO Ram Mandir Trust राम मंदिर ट्रस्टने आपल्या पहिल्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याची (CEO) नियुक्ती केली आहे.

Air Marshal Jitendra Mishra New CEO Ram Mandir Trust

Air Marshal Jitendra Mishra New CEO Ram Mandir Trust

Major decision by the Ram Mandir Trust! Air Marshal Jitendra Mishra appointed as the new CEO : उत्तर प्रदेशातील अयोध्येतील श्रीराम मंदिर ट्रस्टला अखेर पहिला मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) मिळाला आहे. निवृत्त एअर मार्शल जितेंद्र मिश्रा यांची श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ट्रस्टच्या बैठकीत त्यांच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब करण्यात आले.

पुणे दौऱ्यात शिंदेंची आढळरावांच्या घरी अनपेक्षित भेट कारण काय? राजकीय चर्चांना उधाण…

या पदासाठी तब्बल ५,५८५ अर्ज प्राप्त झाले होते. उमेदवारांची निवड प्रक्रिया अनेक टप्प्यांत पार पडली. दिल्ली-एनसीआर, पुणे आणि ओडिशातील संबलपूर येथे तज्ज्ञांच्या विविध पथकांकडून अर्जांचे मूल्यमापन करण्यात आले. मंगळवारी सर्च कमिटीचे सचिव समीर पांड्या यांनी तीन उमेदवारांचा अंतिम पॅनेल ट्रस्टकडे सुपूर्द केला. त्यानंतर बुधवारी ट्रस्टच्या बैठकीत या नावांवर चर्चा करून एअर मार्शल जितेंद्र मिश्रा यांच्या नावाला मंजुरी देण्यात आली. राम मंदिराच्या सीईओ पदासाठी शेवटच्या टप्प्यापर्यंत निवृत्त आयपीएस अधिकारी आणि ‘एन्काउंटर स्पेशालिस्ट’ म्हणून ओळखले जाणारे राजेश पांडे यांच्या नावाचीही चर्चा होती. मात्र, ट्रस्टने अंतिम निर्णय घेत एअर मार्शल जितेंद्र मिश्रा यांची निवड केली.

निवड प्रक्रिया पारदर्शक असल्याचा समितीचा दावा

राम मंदिर ट्रस्टने स्थापन केलेल्या सर्च कमिटीचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती प्रमोद कोहली यांनी निवड प्रक्रिया निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने पार पडल्याचे सांगितले. अंतिम पॅनेलमध्ये समाविष्ट करण्यात आलेली नावे गुणवत्ता आणि पात्रतेच्या आधारावर निवडण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यांच्या मते, निवड समितीतील सदस्य अनुभवी, विश्वासार्ह आणि जबाबदारीने काम करणारे होते. राम मंदिरासारख्या ऐतिहासिक प्रकल्पासाठी योगदान देण्याची संधी मिळाल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.

अशी पार पडली सीईओ निवडीची प्रक्रिया

राम मंदिराच्या सीईओ पदासाठी निवड प्रक्रिया जुलै महिन्यात सुरू करण्यात आली होती.

६ जुलै : सर्च कमिटी स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली.
८ जुलै : समितीच्या तीन सदस्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.
११ जुलै : निवड समितीची पहिली बैठक झाली आणि अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख १८ जुलै निश्चित करण्यात आली.
१४ जुलै : समीर पांड्या यांची समितीच्या सचिवपदी नियुक्ती झाली.
१८ जुलैपर्यंत : सीईओ पदासाठी एकूण ५,५८५ अर्ज प्राप्त झाले.
उमेदवारांची छाननी करण्यासाठी ६०० गुणांची ऑनलाइन मूल्यांकन प्रक्रिया राबवण्यात आली. त्यात ३,५७० उमेदवारांनी सहभाग घेतला.
६० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या उमेदवारांनाच पुढील फेरीसाठी पात्र ठरवण्यात आले.
त्यातून १०८ उमेदवारांची निवड करण्यात आली आणि त्यांना ए, बी आणि सी अशा श्रेणींमध्ये विभागण्यात आले.
३ ते ६ ऑगस्टदरम्यान: उमेदवारांच्या ऑनलाइन मुलाखती घेण्यात आल्या.
त्यानंतर १७ जणांची प्रत्यक्ष मुलाखतीसाठी निवड करण्यात आली. त्यांना ११ आणि १२ ऑगस्ट रोजी अयोध्येत बोलावण्यात आले. यापैकी १६ उमेदवार मुलाखतीला उपस्थित राहिले.

ट्रस्टच्या बैठकीत अंतिम निर्णय

श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्य गोपाल दास यांच्या मणिरामदास छावणी येथील निवासस्थानी महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत ट्रस्टच्या पहिल्या सीईओच्या नियुक्तीवर चर्चा करण्यात आली. सर्च कमिटीने सुचवलेल्या तीन नावांपैकी एअर मार्शल जितेंद्र मिश्रा यांच्या नावावर ट्रस्ट सदस्यांचे एकमत झाले. त्यानंतर त्यांच्या नियुक्तीची अधिकृत घोषणा करण्यात आली. अयोध्येतील भव्य राम मंदिराच्या व्यवस्थापन आणि प्रशासनासाठी ही नियुक्ती महत्त्वाची मानली जात आहे.

Exit mobile version