Download App

Malegaon Bomb Blast Case : काँग्रेसने हिंदू समाजाची माफी मागावी, निकालानंतर समीर कुलकर्णी भावुक

Malegaon Bomb Blast Case : एनआयए न्यायालयाने (NIA Court) आज मोठा निर्णय देत मालेगाव 2008 बॉम्ब स्फोट प्रकरणात

  • Written By: Last Updated:

Malegaon Bomb Blast Case : एनआयए न्यायालयाने (NIA Court) आज मोठा निर्णय देत मालेगाव 2008 बॉम्ब स्फोट प्रकरणात (Malegaon Bomb Blast Case) साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर (Sadhvi Pragya Singh Thakur) यांच्यासह 7 जणांची निर्दोष मुक्तता केली आहे. या प्रकरणातून निर्दोष मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित (Colonel Purohit) आणि समीर कुलकर्णी (Sameer Kulkarni) यांनी माध्यमांशी संवाद साधत काँग्रेसवर (Congress) जोरदार हल्लाबोल केला आहे. तसेच शरद पवार, सुशीलकुमार शिंदे, सोनिया गांधी यांनी हिंदू समाजाची माफी मागावी अशी मागणी समीर कुलकर्णी यांनी केली आहे.

माध्यमांशी बोलताना समीर कुलकर्णी म्हणाले की, या निकालानंतर काँग्रेसने हिंदू समाजाची माफी मागावी. काँग्रेसने या प्रकरणात खूप गलिच्छ राजकारण केले ज्यामुळे आमच्या आयुष्यातील 17 वर्ष खराब झाली. शरद पवार, सुशीलकुमार शिंदे, अहमद पटेल, सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी हिंदू समाजाची माफी मागावी. त्यांनी सनातन धर्माला बदनाम करण्याचा पाप केला आहे. आता या लोकांनी माफी मागावी अशी मागणी देखील माध्यमांशी बोलताना केली. तसेच पोलिसांनी या प्रकरणात 14 लोकांना अटक केली होती मात्र आता पोलिसांकडे ओरिजनल एफआयआर देखील नव्हता असं देखील माध्यमांशी बोलताना समीर कुलकर्णी यांनी दिली.

मंत्रिपदासाठी प्रयत्न पण मिळणार नाही, सुरेस धस आक्रमक; धनंजय मुंडेंवर टिकास्त्र 

तर कर्नल पुरोहित माध्यमांशी बोलताना म्हणाले की, जगात वाईटपेक्षा जास्त चांगले आहे. जे घडलं त्यावर मी आता काही बोलणार नाही. न्यायालयाच्या निर्णयाने मी समाधानी आहे. आज मी कोणाविरुद्ध बोलणार नाही. याआधी ज्याप्रमाणे राष्ट्राने माझ्याकडून सेवा करुन घेतली आहे. तशीच सेवा मी पुन्हा आता करु शकणार याचा मला आनंद होत असल्याची प्रतिक्रिया माध्यमांशी बोलताना कर्नल पुरोहित यांनी दिली.

follow us