Private Schools Fees In India : देशात दररोज वाढणाऱ्या महागाईत खाजगी शाळा कशा प्रकारे मध्यमवर्गीय पालकांची आर्थिक लूट करत आहे. या आर्थिक लूटमुळे मध्यमवर्गीय कुटुंबाचा आर्थिक गणित कोणत्या पद्धतीने कोलमडच चालले आहेत याबाबत मोठा दावा शिक्षिका आणि चार्टर्ड अकाउंटंट मीनल गोयल (Minal Goyal) यांनी केला आहे. युट्यूबवर (YouTube) अपलोड करण्यात आलेल्या या व्हिडिओमध्ये देशात खाजगी शिक्षण हे आर्थिक सापळा बनत चालले असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
मीनल गोयल यांनी या व्हिडिओमध्ये खाजगी शाळेत असणाऱ्या शुल्क रचनेचे विश्लेषण केले आहे. प्रत्येक मुलाच्या शिक्षणासाठी दरवर्षी अडीच ते तीन लाखांचा खर्च येतो. त्यामध्ये प्रवेश शुल्क 35 हजार, शिकवणी शुल्क 1.4 लाख, वार्षिक शुल्क 38 हजार, वाहतुकीसाठी 44 ते 73 हजार आणि पुस्तके आणि गणवेशासाठी 20 ते 30 हजार रुपये यांचा समावेश असल्याचा त्या म्हणाल्या. तसेच मध्यम श्रेणीच्या शाळांचे शुल्क 1 लाख रुपयांपासून सुरु होते आणि एलिट शाळांमध्ये 4 लाखांपर्यंत शुल्क आकारण्यात येत असल्याची माहिती देखील त्यांनी या व्हिडिओमध्ये दिली आहे.
तर हैदराबादमध्ये शाळेने अनिवार्य केलेल्या विक्रेत्याकडून एका पालकाने पाचवीच्या पाठ्यपुस्तकांसाठी 6,903 रुपये खर्च केले मात्र विक्रेत्याने त्या पालकाला कोणतीही सूट दिली नसल्याची माहिती देखील या व्हिडिओमध्ये शिक्षिका आणि चार्टर्ड अकाउंटंट मीनल गोयल यांनी दिली. आज आपण आरोग्यसेवेच्या महागाईबद्दल बोलतो पण शिक्षणाची महागाई ही मध्यमवर्गीयांसाठी मूक हत्यार ठरत आहे. आता फिनटेक कंपन्या शालेय शुल्कासाठी ईएमआय सेवा उपलब्ध करुन देत आहेत. त्यामुळे आता गृहकर्जांसोबत शिक्षणाचेही हप्ते सुरु झाले असं देखील त्या म्हणाल्या. पण सार्वजनिक शाळा यासाठी पर्याय नाहीतस असेही त्यांनी म्हटले आहे.
भारताच्या अडचणी वाढणार, चौथ्या कसोटीसाठी इंग्लंड संघ जाहीर; ‘या’ स्टार खेळाडूला संधी
तर देशाच्या शिक्षणपरिस्थितीवर मोठा खुलासा करत त्यांनी शिक्षकांच्या 8 लाख जागा रिक्त असून त्यापैकी केवळ उत्तर प्रदेशात 5 हजार शाळांमध्ये फक्त एक शिक्षक आहे. तर दिल्लीतील शाळांमधील सहावीच्या 70 टक्के विद्यार्थ्यांना एकही परिच्छेद वाचता येत नसल्याची माहिती त्यांनी या व्हिडिओमध्ये दिली आहे. तर देशातील तब्बल 1 लाख सार्वजनिक शाळांमध्ये वीज नाही, 46 हजार शाळांमध्ये शौचालय नाही, 39 हजार शाळांमध्ये पिण्याचे पाणी नाही. आज भारत शिक्षणावर जीडीपीच्या फक्त 4.6 टक्के खर्च करतो अशी माहिती देखील त्यांनी या व्हिडिओमध्ये दिली आहे.