महिलांनो लक्ष द्या, गॅस सिलिंडरचं टेन्शन कायमचं मिटलं! आता ATM मशीनमधून मिळणार भरलेला गॅस

BPCL LPG ATM रात्री-अपरात्री गॅस संपला तरी आता चिंता नाही, 24 तास सुरू राहणारं गॅसचं ATM पाहा कसं काम करतं...

महिलांनो लक्ष द्या, गॅस सिलिंडरचं टेन्शन कायमचं मिटलं! आता ATM मशीनमधून मिळणार भरलेला गॅस

महिलांनो लक्ष द्या, गॅस सिलिंडरचं टेन्शन कायमचं मिटलं! आता ATM मशीनमधून मिळणार भरलेला गॅस

BPCL Start First LPG ATM In Middle East War Know Details : ऐनवेळी गॅस संपला की तुमचीही पळापळ होते? गॅस बुकिंगसाठी कसरत, त्यात डिलिव्हरी बॉयची दोन-दोन दिवस वाट पाहणं आणि वरून आखाती देशातल्या युद्धामुळे गॅस टंचाईची टांगती तलवार! पण आता हे सगळं टेन्शन विसरा. कारण जसं आपण बँकेच्या ATM मधून पैसे काढतो, तसाच आता भरलेला गॅस सिलिंडर सुद्धा मशीनमधून बाहेर येणार आहे. भारत पेट्रोलियमने (BPCL) पायलट प्रोजेक्ट अंतर्गत देशातलं पहिलं ‘LPG ATM’ सुरू केलंय. हे ‘जादुई मशीन’ नक्की कसं काम करतं? यामुळे तुमचे कष्ट कसे वाचवणार आहेत? त्याबद्दल जाणून घेऊया…

कुठे सुरू झालं हे हायटेक ATM?

देशातलं हे पहिलं हायटेक गॅस ATM बसवण्यात आलंय गुरुग्रामच्या सोहना रोडवरील सेक्टर 33 मध्ये. इराण युद्ध आणि जागतिक तणावामुळे गॅस पुरवठ्यावर परिणाम होण्याची भीती असताना, हे मशीन सर्वसामान्यांसाठी एक मोठा आधार ठरत आहे.

कसं काम करतं LPG ATM मशीन

या ATM मधून सिलिंडर घेणं अगदी सोपं आहे! ही पूर्णपणे Contactless आणि Automated सिस्टीम आहे. यासाठी फक्त तुम्हाला मशीनवर तुमचा रजिस्टर्ड मोबाईल नंबर टाकायचा आहे. त्यानंतर मोबाईलवर आलेला OTP एंटर करून तुमची ओळख पटवा. तुमच्याकडच्या रिकाम्या सिलिंडरवरचा QR कोड स्कॅन करा. डिजिटल पद्धतीने (UPI किंवा कार्डने) पेमेंट करा. प्रक्रिया पूर्ण होताच मशीनचा दरवाजा उघडेल, तुमचा जुना सिलिंडर आत जमा होईल आणि एक सीलबंद, भरलेला नवीन सिलिंडर बाहेर येईल. विशेष म्हणजे हे सगळं घडतं अवघ्या ३ मिनिटांत.

जड सिलिंडरला ‘टाटा-बायबाय’

या ATM ची सर्वात मोठी खास बात म्हणजे यातील सिलिंडर हे जुन्या जमान्यातील जड आणि गंजलेले लोखंडी सिलिंडर नाहीत. तर हे आहेत आधुनिक फायबरपासून बनलेले ‘कंपोझिट सिलिंडर’. लोखंडी सिलिंडरच्या तुलनेत हे वजनाला अर्धे आहेत, त्यामुळे महिला किंवा वृद्ध व्यक्तीही सहज उचलू शकतात. याशिवाय हे सिलिंडर पारदर्शक आहेत, त्यामुळे तुमच्या सिलिंडरमध्ये नक्की किती गॅस शिल्लक आहे, हे तुम्हाला डोळ्यांनी दिसेल.

हे ATM 24 तास आणि 7 दिवस सुरू असणार आहे. त्यामुळे रात्री-अपरात्री कधीही गॅस संपला, तरी एजन्सी उघडण्याची वाट पाहायची गरजा यामुळे संपलीये. विशेष म्हणजे, मशीनमध्ये सिलिंडर कमी झाले की हे स्मार्ट मशीन स्वतःहून गॅस एजन्सीला मेसेज पाठवतं आणि स्टॉक पुन्हा भरला जातो. BPCL चा हा प्रयोग यशस्वी झाला, तर लवकरच आपल्या महाराष्ट्रात आणि प्रत्येक मोठ्या शहरात असे ‘गॅस ATM’ पाहायला मिळतील. यामुळे मध्यस्थांची कटकट आणि लांबच लांब रांगांपासून आपली कायमची सुटका होईल.

Exit mobile version